अॅशेससाठी इंग्लंड संघ जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
या संघ जाहीर करण्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड या दोन वेगवान गोलंदाजांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर, या दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी एक मोठे आव्हान असणार आहे. आर्चर त्याच्या अचूक लाईन आणि लेंथसह उसळत्या पर्थच्या खेळपट्टीचा आणि त्याच्या जबरदस्त वेगासह वूडचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. तसेच, गस अॅटकिन्सन आणि ब्रायडन कार्स यांना वेगवान गोलंदाजीचे पर्याय म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंडच्या फलंदाजी संघात अनुभव आणि तरुणाईचा उत्साह यांचा मेळ साधण्यात आला आहे. जॅक क्रॉली आणि बेन डकेट डावाची सुरुवात करणार आहेत, तर जो रूट आणि ऑली पोप मधल्या फळीची धुरा सांभाळणार आहेत. तरुण आणि प्रतिभावान जेमी स्मिथला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून समाविष्ट केले गेले आहे. जो फलंदाजीत देखील आपले योगदान देऊ शकतो. फिरकी विभागात, संघाने तरुण ऑफ-स्पिनर शोएब बशीरवर विश्वास दाखवण्यात आला आहे.
इंग्लंड क्रिकेट संघासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे ऑस्ट्रेलियन भूमीवर अॅशेस कसोटी जिंकणे असणार आहे. संघाने २०११ मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर शेवटचा कसोटी सामना जिंकता अल होता. तेव्हापासून इंग्लंडला सलग पराभवांना सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या १० वर्षांपासून अॅशेस करंडक आपल्याकडे कायम राखला आहे. कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक बेन स्टोक्स आक्रमक दृष्टिकोनाने, “बॅझबॉल” रणनीतीने हा दुष्काळ संपवून २०११ च्या यशाची पुनरावृत्ती करण्याची आशा बाळगून मैदानात उतरणार आहे.
हेही वाचा : बांगलादेशातील हिंसेचा भारतीय खेळाडूंना फटका! 10 तास ढाका विमानतळावर होते बसून
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, शोएब बशीर, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, मार्क वूड.






