
IND vs NED, T20 World Cup: Hardik Pandya's 'that' amazing six! Coach Gambhir and the audience are also surprised; Reaction VIRAL
Gautam Gambhir’s reaction to Hardik Pandya’s six : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत १८ फेब्रुवारी रोजी भारत आणि नेदरलँड्स आमनेसामने आले होते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या. तर नेदरलँड्स संघ २० षटकात ७ विकेट्स गमावून १७६ धावाच करू शकला. भारताने त्यांचे गट अ सामन्यात विजयी चौकार मारला. या सामन्यात ६६ धावा आणि दोन विकेट्स घेणाऱ्या शिवम दुबेला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. दरम्यान, या सामन्यात हार्दिक पंड्याने देखील छोटेखानी खेळी केली. या खेळीत त्याने शानदार षटकार ठोकला, या षटकाराने सर्वांचेच लक्ष्य वेधले.
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने २१ चेंडूत ३० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ३ षटकार लागवले. यामध्ये त्याने काइल क्लेनच्या पाचव्या चेंडूवर हार्दिक पंड्याने जबरदस्त षटकार मारला. चेंडू हवेत इतका उंच गेला की तो सीमारेषेवर पकडला जाण्याची शक्यता वाटली. पण अखेर तो लांबच्या दिशेने षटकार मारण्याच्या स्थितीत जाऊन पोहचला. हार्दिक पंड्याच्या अविश्वसनीय पंच शॉटवर प्रशिक्षक गंभीरला देखील विश्वास बसला नाही. यावेळी तो चेंडूकडे पाहतच राहिला.
Finishes games like it’s personal.
Aura so heavy it breaks the internet Hardik Pandya 🥶🔥 What a short man 💀#HardikPandya #INDvsNED pic.twitter.com/TmBFjF0cIC — Arjun🥀 (@Hardik_trends) February 18, 2026
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँड्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ३५ धावांवर संघाने आपला पहिला गडी गमावला. मॅक्स ओ’डॉड २० धावा कडून बाद झाला. त्यानंतर नेदरलँड्स संघाच्या विकेट्स जात राहिल्या. मायकेल लेविट २४ धावा, बास डी लीडे ३३ धावा, कॉलिन अॅकरमन २३ धावा करून बाद झाले. तर आर्यन दत्त भोपळा न फोडता माघारी गेला. स्कॉट एडवर्ड्स १५ धावा करून बाद झाला. झॅक लायन-कॅचेट २६ धावा केल्या. नोआह क्रोस २५ धावांवर तर लोगन व्हॅन बीक ४ धावांवर नाबाद राहिले. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सारवधिक ३ विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबेने २ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.