फोटो सौजन्य - सोशल मीडिया
हार्दिक पांड्या : भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने आयपीएल २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना केला. त्यामुळे त्यानंतर त्याच्या दुखापतीवर देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने विश्वचषकामध्ये केलेल्या कामगिरीमुळे भारताच्या सर्व क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यांनंतरही तो सध्या T२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी कमालीची कामगिरी करत आहे. तो फक्त गोलंदाजीमध्येचा नाही तर फलंदाजीमध्ये सुद्धा त्याची ताकत दाखवत आहे. आता सध्या तो टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हार्दिक पांड्याची बॅट अजिबात थांबवता येत नाही. गेल्या काही डावांमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. पांड्याने पुन्हा एकदा स्फोटक खेळी करत बडोद्याला विजयापर्यंत नेले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यात त्रिपुराविरुद्ध त्याने ४७ धावा केल्या होत्या. या काळात त्याने एकूण ५ षटकार आणि ३ चौकार मारले. पांड्याच्या खेळीच्या जोरावर बडोद्याने अवघ्या ११.२ षटकांत सामना जिंकला.
त्रिपुराने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बडोदा संघासाठी हार्दिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने २३ चेंडूंचा सामना करत ४७ धावा केल्या. पंड्याने या कालावधीत ३ चौकार आणि ५ षटकार मारले. बडोद्याच्या डावात परवेझ सुलतान त्रिपुरासाठी १० वे षटक टाकत होता. पंड्याने सुलतानच्या षटकात चार षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात त्याने २८ धावा लुटल्या.
Hardik Pandya in this SMAT:
vs TN – 6,6,6,6,4,1 in a single over.
vs Tripura – 6,0,6,6,4,6 in a single over.
– THIS IS HARDIK PANDYA…!!!! 🔥🥶 pic.twitter.com/e1lRMwaGNf
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 29, 2024
हार्दिकने गेल्या अनेक डावांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. तो बडोद्याकडून तामिळनाडूविरुद्ध शेवटचा सामना खेळला. या सामन्यात पांड्याने ६९ धावांची खेळी केली होती. त्याने उत्तराखंडविरुद्ध नाबाद ४१ धावा केल्या होत्या. गुजरातविरुद्धही त्याने स्फोटक खेळी खेळली होती. हार्दिकने नाबाद 74 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने 1 विकेटही घेतली.
🚨 HARDIK PANDYA SMASHED 28 RUNS IN A SINGLE OVER IN SMAT. 🚨
– The Madness of Pandya…!!!! pic.twitter.com/1DrY1vb5Ff
— Johns. (@CricCrazyJohns) November 29, 2024
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्रिपुराने प्रथम फलंदाजी करताना १०९ धावा केल्या. यादरम्यान कर्णधार मनदीप सिंगने अर्धशतक झळकावले. त्याने ४० चेंडूत ५० धावा केल्या. यादरम्यान बडोद्याकडून गोलंदाजी करताना कर्णधार कृणाल पंड्याने २ बळी घेतले. तर अभिमन्यू सिंगने ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात बडोद्याने ११.२ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. त्यासाठी पंड्यासोबत मितेश पटेलनेही चांगली कामगिरी केली. त्याने ३७ धावा केल्या.