फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चेतेश्वर पुजारा : भारताच्या संघ सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत करून मालिकेत आघाडी घेतली आहे. आता भारताचा संघ दुसरा सामना ६ डिसेंबरपासून खेळणार आहे. भारताच्या संघाने पहिला सामना रोहित शर्माच्या अनुपस्थित खेळला. यावेळी भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह होता. आता रोहित शर्माचे संघामध्ये पुनरागमन झाले आहेत. यामध्ये रोहित शर्माच्या जागेवर केएल राहुलने सलामीवीर फलंदाज म्हणून फलंदाजी केली होती, यामध्ये राहुलने संघासाठी दोन्ही इनिंगमध्ये कमालीची कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे टीम इंडियाला राहुल नक्कीच संघाबाहेर काढणार नाही.
आता रोहित शर्मा संघामध्ये आल्यामुळे तो संघासाठी यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंग करताना दिसेल त्यामुळे मग केएल राहुलला संघामध्ये कोणत्या स्थानावर खेळवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता यावर भारताचा कसोटी क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने केएल राहुलला कोणत्या स्थानावर पाठवायचे यासंदर्भात सल्ला दिला आहे. रोहित डावाची सुरुवात करणार आणि राहुलला खेळवणार हेही निश्चित आहे. मात्र, राहुलला तिसऱ्या क्रमांकापेक्षा कमी पाठवू नये, असे मत भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रोहितने कसोटीत डावाची सुरुवात केली, तर त्याचे स्थान बदलणे त्याच्यासाठी कठीण आहे. शुभमन गिलही प्लेईंग इलेव्हनमध्ये परतणार असून तोही टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो. मात्र, राहुल हा असा फलंदाज आहे जो कोणत्याही स्थितीत स्वत:ला जुळवून घेऊ शकतो. राहुलला तिसऱ्या क्रमांकापेक्षा खाली पाठवू नये, असे पुजाराने म्हटले आहे.
त्याने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की , “मला वाटते की जसा फलंदाजीचा क्रम आहे तसाच ठेवायला पाहिजे ज्यामध्ये फक्त केएल आणि यशस्वीने डाव उघडला पाहिजे. रोहितने तिसऱ्या क्रमांकावर आणि शुभमनने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी. जर रोहितला सलामी करायची असेल तर केएलने फलंदाजी करावी. तिसरा क्रमांक, पण माझ्या मते, त्याने फलंदाजी करायला हवी.
— K L Rahul (@klrahul) September 13, 2024
राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीत सलामीवीर म्हणून सर्वाधिक ७७ डाव खेळले आहेत. यामध्ये त्याने ३५.३९ च्या सरासरीने ३६५४ धावा केल्या आहेत ज्यात सात शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. राहुलने सलामी करताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च १९९ धावांची खेळीही खेळली आहे.