नुकताच मुंबई इंडिअन्सचा कर्णधार झालेला हार्दिक पांड्या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मुंबई इंडिअन्सचा नवा कर्णधार निवडल्यामुळे क्रिकेटर हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. परंतु आता हार्दिक पांड्या नाही तर त्याचा सावत्र भाऊ सध्या चर्चेत आहे. क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केली आहे.
हार्दिक पांड्याचा सावत्र भाऊ वैभव असे त्याचे नाव आहे. हे प्रकरण २०२१ चे आहे जेव्हा आरोपी वैभवने पांड्या ब्रदर्ससोबत पॉलिमर व्यवसायाची कंपनी सुरू केली होती. तेव्हा या कंपनीमध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याची ४०-४० टक्के तर वैभवची 20 टक्के भागीदारी होती. भागीदारीच्या अटींनुसार कंपनीला मिळणारा नफा तिघांमध्ये विभागायचा होता असे ठरवण्यात आले होते.
परंतु असे सांगण्यात आले आहे की, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याचे सुमारे ४.३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण याआधी त्यांनी ठरवले होते की, कंपनीच्या नफ्याची रक्कम पंड्या ब्रदर्सला देण्याऐवजी आरोपी वैभवने वेगळी कंपनी स्थापन करून नफ्याची रक्कम त्यात वर्ग केली. हार्दिकच्या तक्रारीच्या आधारे ईओडब्ल्यूने वैभव पांड्याला अटक केली आहे. आरोपी वैभवला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.