फोटो सौजन्य : IndianPremierLeague
हार्दिक पांड्या – श्रेयस अय्यर : आयपीएल २०२५ चा हा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे, ३ जून रोजी फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघानी आतापर्यत एकही आयपीएलची ट्राॅफी जिंकलेली नाही त्यामुळे यावेळी नव्या संघाकडे आयपीएलचे टायटल जाणार आहे. १ जून रोजी मुबंई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये पार पडला या सामन्यात पंजाबच्या संघाने विजय मिळवुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता सामना झाल्यानंतर मोठी अपडेट समोर आली आहे.
क्वालिफायर २ नंतर, बीसीसीआयने पंजाब आणि मुंबई दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई केली आहे. आता दोन्ही कर्णधारांना क्वालिफायर २ मध्ये चूक केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. पावसामुळे क्वालिफायर २ उशिरा सुरू झाला, जरी सामना दोन तास जास्त खेळवण्याचा नियोजित होता. या सामन्यात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या या दोन्ही कर्णधारांना स्लो ओव्हर-रेटसाठी मोठा दंड ठोठावला. पावसामुळे सामना व्यत्यय आल्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला.
PBKS vs MI : पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्या खचला! म्हणाला ‘मी दोषी आहे…’
या हंगामात पंजाब किंग्ज दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला आहे. त्यामुळे कर्णधार अय्यरला २४ लाख रुपये आणि इम्पॅक्ट प्लेअरसह संघातील इतर खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई इंडियन्सला या हंगामात तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा दोषी आढळला आहे, ज्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याला ३० लाख रुपये आणि संघातील इतर खेळाडूंना प्रत्येकी १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ गडी गमावून २०३ धावा केल्या, तरीही मुंबईच्या गोलंदाजांना हे लक्ष्य राखता आले नाही. यानंतर, पंजाब किंग्जने आक्रमक फलंदाजी करत सामना फक्त १९ षटकांत संपवला. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने ८७ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. आता ११ वर्षांनंतर, पंजाब किंग्ज आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे, अय्यरकडे आता पहिल्यांदाच पंजाब किंग्जला विजेतेपद मिळवून देण्याची सुवर्णसंधी आहे.