फोटो सौजन्य - IPL
IPL 2025 Update : इंडीयन प्रिमियर लिग 2025 चे उर्वरित सामने 17 मेपासुन खेळवले जाणार आहेत. यामध्ये कोणते सामने कुठे खेळवले जाणार या संदर्भात बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले आहे. 13 सामन्यांचे आयोजन 6 ठिकाणी केले जाणार आहे. भारत विरूध्द पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेल्या तणावाच्या वातावरणामुळे आयपीएल काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेले काही विदेशी खेळाडू हे त्याच्या मायदेशात गेले होते. बीसीसीआयने आयपीएल 2025 पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे, जिथे परदेशी खेळाडूंना त्यांच्या संबंधित आयपीएल संघात सामील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, लीग टप्प्यातील 13 सामने शिल्लक आहेत हे सामने 17 मे पासून सुरू होणार आहेत, तर त्याचा अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाणार आहे. हे सर्व सामने सहा शहरांमध्ये खेळवले जातील, तर प्ले-ऑफचे निकाल अद्याप लागायचे आहेत. यामध्ये विदेशी खेळाडु खेळणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह होते. असे म्हटले जात होते की काही खेळाडू हे भारतामध्ये आयपीएल खेळण्यासाठी येणार नाहीत तर काही खेळाडू मोजक्याच सामन्यासाठी आयपाएल खेळण्यासाठी येणार आहेत. उर्वरित सामन्यामध्ये कोणते खेळाडू सामील होणार आहेत यावर एकदा नजर टाका.
🚨 HAZLEWOOD COMING FOR IPL. 🚨
– Josh Hazlewood will join RCB for the remainder of IPL 2025. (Vishesh Roy). pic.twitter.com/l2dVt1MGu4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 15, 2025
कोलकता नाईट राइडर्सचे सुनील नरेन आणि आंद्रे रसेल हे दोघेही संघामध्ये सामील झाले आहेत. तर स्पेसन जाॅन्सन देखील केकेआर संघात पुन्हा संघामध्ये सामील झाला आहे. आरसीबी संघातील रोमारिया शफर्ड, जेकेब बेथल आणि लियाम लिव्हींस्टन हे पुन्हा संघाचा भाग झाले आहेत. जेकेब बेथल हा फक्त 2 सामने खेळणार आहे त्यानंतर तो प्लेऑफचे सामने खेळणार नाही. लुंगी एगिडी सुद्धा आरसीबीसोबत पुन्हा एकदा जोडला गेला आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्सचा मार्को यान्सनने सुद्धा पंजाब किंग्सला जॉइन केले आहे. असे म्हटले जात आहे की जोश इंग्लिश आणि स्टाईनिस या दोघांचा खेळणे आयपीएल मध्ये उर्वरित सामन्यात कठीण आहे.
जॅक फ्रेजर याने देखील आयपीएलमधून नाव मागे घेतले आहे. राजस्थान रॉयल्स चा महत्वाचा गोलंदाज जोफ्रा आर्चर आत्ता संघाकडून खेळणार नाही. त्याचबरोबर जेमी ओव्हरटर्न आणि सॅम करण हे दोघेही चेन्नईचा भाग नसणार आहेत. जॉस हेझलवूड संघाचा भाग असणार आहे त्याचबरोबर फिल सॉल्ट देखील उर्वरित सामन्यात आयपीएल मध्ये दिसणार आहे. केकेआर चा मोईन अली पुढील उर्वरित सामनात खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. जॉस बटलरच्या जागेवर नव्या खेळाडूला संघात स्थान मिळाले आहे. मुंबईचा विल जॅक्स प्ले ऑफ मध्ये खेळणार नाही असे म्हटले जात आहे.
लीगची सुरुवात 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्याने होणार आहे. 8 मे रोजी रद्द झालेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना आता 24 मे रोजी जयपूर येथे खेळवला जाईल. या लीगमध्ये पुन्हा खेळण्यास सहमती दर्शविणाऱ्या खेळाडूंवर एक नजर टाकूया. याशिवाय, अशा खेळाडूंची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे जे यापुढे या लीगमध्ये खेळण्यासाठी भारतात येणार नाहीत.