
आयपीएल लिलावात मोठी खळबळ! (Photo Credit - X)
संघनिहाय पर्से आणि स्लॉट्सची आकडेवारी
| संघ (Team) | पर्समध्ये शिल्लक रक्कम | एकूण रिक्त स्लॉट्स | विदेशी खेळाडू स्लॉट्स |
| कोलकाता नाइट रायडर्स (KKR) | ₹ ६४.३० कोटी | १३ | ०६ |
| चेन्नई सुपर किंग्स (CSK) | ₹ ४३.४० कोटी | ०९ | ०४ |
| सनराइजर्स हैदराबाद (SRH) | ₹ २५.५० कोटी | १० | ०२ |
| लखनऊ सुपर जायंट्स (LSG) | ₹ २२.९५ कोटी | ०६ | ०४ |
| दिल्ली कॅपिटल्स (DC) | ₹ २१.८० कोटी | ०८ | ०५ |
| रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) | ₹ १६.४० कोटी | ०८ | ०२ |
| राजस्थान रॉयल्स (RR) | ₹ १६.०५ कोटी | ०९ | ०१ |
| गुजरात टायटन्स (GT) | ₹ १२.९० कोटी | ०५ | ०४ |
| पंजाब किंग्स (PBKS) | ₹ ११.५० कोटी | ०४ | ०२ |
| मुंबई इंडियन्स (MI) | ₹ ०२.७५ कोटी | ०५ | ०१ |
प्रमुख संघांचे निर्णय आणि रणनीती
शाहरुख खानच्या KKR संघाने ऑक्शनपूर्वी त्यांचे सर्वात महागडे खेळाडू वेंकटेश अय्यर (₹२३.७५ कोटी) आणि आंद्रे रसेल यांना रिलीज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. किंग खानचा संघ ऑक्शनमध्ये रसेलला पुन्हा विकत घेऊ शकतो. KKR ला सर्वाधिक १३ स्लॉट्स भरायचे आहेत आणि त्यांच्याकडे सर्वाधिक ₹ ६४.३० कोटी इतकी मोठी रक्कम शिल्लक आहे.
पाच वेळा विजेत्या CSK ने ट्रेड डीलद्वारे संजू सॅमसनला संघात घेतले आहे. तर, त्यांनी माथीशा पथिराना, रचिन रवींद्र आणि रवींद्र जडेजासारख्या प्रमुख खेळाडूंना रिलीज केले आहे. CSK ला ९ खेळाडू घ्यायचे आहेत आणि त्यांच्याकडे ₹ ४३.४० कोटींचा मोठा पर्स आहे.
SRH ने मोहम्मद शमीला लखनऊशी ट्रेड केले आहे. राहुल चाहर, ॲडम झम्पा या खेळाडूंना रिलीज केल्यानंतर त्यांच्या पर्समध्ये ₹ २५.५० कोटी शिल्लक आहेत आणि त्यांना १० स्लॉट्स भरायचे आहेत.
LSG संघाने कर्णधार ऋषभ पंतला (₹२७ कोटी) रिटेन ठेवण्याचा निर्णय घेतला, जो लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता होती. त्यांनी आकाश दीप, रवी बिश्नोई आणि डेव्हिड मिलर यांसारख्या खेळाडूंना रिलीज केले आहे. त्यांच्याकडे ६ स्लॉट्ससाठी ₹ २२.९५ कोटी शिल्लक आहेत.
५. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
दिल्ली कॅपिटल्सने फाफ डू प्लेसिस, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, सादिकुल्लाह अटल, मनवंत कुमार, मोहित शर्मा आणि दर्शन नालकांडे यांसारख्या खेळाडूंना रिलीज केले आहे. यामुळे दिल्लीकडे एकूण आठ जागा शिल्लक आहेत, ज्यामध्ये परदेशी खेळाडूंसाठी पाच जागा आहेत.
डिफेंडिंग चॅम्पियन RCB ने ऑलराउंडर लियाम लिव्हिंग्स्टन आणि युवा गोलंदाज रसिख दार यांना रिलीज केले आहे. त्यांच्याकडे ८ स्लॉट्ससाठी ₹ १६.४० कोटी शिल्लक आहेत.
RR ने वानिंदु हसरंगा आणि महीश तीक्षणासह अनेक खेळाडूंना रिलीज केले. मात्र, त्यांनी रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांसारख्या खेळाडूंना ट्रेड करून संघात सामील केले आहे. त्यांच्याकडे ९ स्लॉट्ससाठी ₹ १६.०५ कोटी बाकी आहेत.
८. गुजरात टायटन्स (Gujarat Titans)
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आगामी आयपीएल लिलावापूर्वी जेराल्ड कोएत्झी, महिपाल लोमरोर आणि दासुन शनाका सारख्या खेळाडूंना रिलीज केले आहे. गुजरातकडे आता पाच खेळाडूंचे स्थान शिल्लक आहेत, ज्यात परदेशी खेळाडूंसाठी चार आहेत.
९. पंजाब किंग्ज (Punjab Kings)
पंजाब किंग्जने आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी अनेक प्रमुख खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, प्रवीण दुबे आणि कुलदीप सेन यांचा समावेश आहे. तथापि, पंजाबच्या संघात आता चार खेळाडूंची जागा रिक्त आहे. दोन परदेशी खेळाडूंचाही समावेश होऊ शकतो.
मुंबई इंडियन्सने मुजीब उर्र रहमान, लिझाड विल्यम्स यांना रिलीज केले आहे. सर्वात कमी रक्कम (₹ २.७५ कोटी) शिल्लक असलेल्या मुंबईला ५ स्लॉट्स भरायचे आहेत, ज्यात केवळ एका विदेशी खेळाडूचा समावेश आहे.