आयपीएल फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2026 Retention : आयपीएल २०२६ रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व फ्रँचायझींकडून त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंच्या यादी देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयपीएल २०२६ साठी खेळाडूंच्या ट्रेडबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. या चर्चांना अंत एकदाच आता पूर्णविराम मिळाला असून बीसीसीआयने ट्रेड झालेल्या खेळाडूंची यादी अखेर जाहीर केली आहे. यानुसार, आगामी हंगामात केवळ जडेजा आणि सॅमसनच नाही, तर अर्जुन तेंडुलकर आणि शमी यांच्या संघात देखील बदल झाल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर ५ खेळाडूदेखील नवीन फ्रँचायझीकडून खेळताना दिसणार आहे.
चेन्नईच्या संघातील रवींद्र जडेजा आणि सॅम करण आता राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहेत तर त्याबदल्यास राजस्थानने संजू सॅमसनला चेन्नईला दिले आहे. जडेजा हा आयपीएलमधील सर्वांत अनुभवी खेळाडूपैकी एक आहे. त्याने चेन्नईसाठी एकूण १२ हंगाम खेळले आहेत. तो २०१२ पासून चेन्नईकडून खेळतो आहे. इतकेच नाही तर चेन्नईला ५ पैकी ३ विजेतेपदे जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. गेल्या हंगामात चेन्नईने जडेजाला १८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. मात्र, त्याला आता १४ कोटी रुपयांत राजस्थानने खरेदी केली आहे. मोहम्मद शमी लखनौ संघात सामील याशिवाय मोहम्मद शमी आता हैदराबादसोडून लखनौ संघाकडून खेळणार आहे. यापूर्वी तो गुजरात संघाचा भाग राहिला आहे. गेल्या वर्षी हैदराबाद संघाने त्याला १० कोटी रुपयात खरेदी केले. त्यात मॅच फीवर आता तो लखनौच्या संघाकडून खेळणार आहे. शमीने आतापर्यंत ११९ आयपीएल सामने खेळले आहेत. २०२३ च्या हंगामात त्याने १७ सामन्यात २८ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती.
संजू सॅमसन चेन्नईकडून खेळणार याशिवाय सॅम करणला त्याच्या पूर्वी मॅच फीमध्ये म्हणजे २.४ कोटी रुपयात खरेदी करण्यात आले आहे. २७ वर्षी सॅम करण हा ६४ आयपीएल सामने खेळले असून यापूर्वी तो पंजाबसाठी खेळला आहे. त्यानंतर त्याला चेन्नईने खरेदी केलं. आगामी हंगामात तो राजस्थानकडून खेळणार आहे. सॅमसनने राजस्थानसाठी ११ हंगाम खेळले आहेत. तो गेल्या काही हंगामात या संघाचा कर्णधारही होता. त्याने २०२२ मध्ये राजस्थानला अंतिम सामन्यापर्यंतही पोहचवले होते. संजू सॅमसनचा हा तिसराच संघ आहे. त्याने २०१३ साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. तो पहिली तीन वर्षे या संघाकडून खेळल्यानंतर २०१६ आणि २०१७ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता.
सॅम करन – इंग्लिश अष्टपैलू खेळाडू सीएसके वरून आरआर मध्ये बदली. २.४ कोटी शुल्क. मयंक मार्कडे केकेआर वरून एमआय मध्ये परतला (३० लाख). अर्जुन तेंडुलकर एमआयवरून एलएसजीमध्ये बदली (३० लाख). नीतीश राणा आरआरवरून डीसीमध्ये सामील (४.२ कोटी). डोनोवन फरेरा डीसीवरून आरआरमध्ये परतला (१ कोटी)






