Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs SRH : हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडचा मोठा पराक्रम! रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या दिग्गजांना टाकले मागे.. 

आयपीएल २०२५ चा ३३ वा सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवायला आहे. तसेच या सामन्यात हैद्राबादचा ट्रॅव्हिस हेडने आयपीएल इतिहासात सर्वात जलद १००० धावा पूर्ण केल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 18, 2025 | 12:42 PM
MI vs SRH: Hyderabad's Travis Head's great feat! He left behind legends like Rohit Sharma, Virat Kohli..

MI vs SRH: Hyderabad's Travis Head's great feat! He left behind legends like Rohit Sharma, Virat Kohli..

Follow Us
Close
Follow Us:

MI vs SRH : आयपीएल २०२५ चा ३३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात याला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैद्राबादचा पराभव केला. प्रथम  फलंदाजी करत हैद्राबादने १६२ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने १९ ओव्हरमध्ये ६ गड्यांच्या  बदल्यात हे लक्ष्य पूर्ण केले. जरी हैद्राबादला पराभवाचा सामना करावा लगाला असला तरी या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने एक भीम पराक्रम केला आहे. ट्रॅव्हिस हेड आयपीएल इतिहासात सर्वात जलद १००० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने हा इतिहास रचला आहे.

ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमध्ये फक्त ५७५ चेंडूंचा सामना करत १००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम रचला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध हेडने २८ धावा केल्या. यादरम्यान, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १००० धावा देखील पूर्ण केल्या. २०२४ पासून सनरायझर्स हैदराबादसाठी ओपनिंग करताना ट्रॅव्हिस हेडने ही कामगिरी केली.

हेही वाचा : IPL 2025: वानखेडे स्टेडियमवर ‘हिटमॅन’ चा दबदबा! Rohit Sharma, कडून IPL इतिहासातील मोठ्या विक्रमाला गवसणी

हजार धावा करणारा हेड दुसरा सर्वात जलद फलंदाज

हेड १००० धावा करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. या यादीमध्ये आंद्रे रसेल पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. ज्याने ५४५ चेंडूत १००० धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीमध्ये हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेनचा देखील समावेश आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर असून  त्याने ५९४ चेंडूत ही कामगिरी करून दाखवली आहे.

१००० आयपीएल धावा पूर्ण करण्यासाठी घेतलेले सर्वात कमी चेंडू

  1. आंद्रे रसेल -५४५
  2.  ट्रॅव्हिस हेड – ५७५ *
  3.  हेनरिक क्लासेन -५९४
  4. वीरेंद्र सेहवाग -६०४
  5. ग्लेन मॅक्सवेल -६१०
  6. ख्रिस गेल -६१५
  7. युसूफ पठाण -६१७
  8. सुनील नरेन -६१७

हेही वाचा : MI vs SRH : सूर्यकुमार यादव ‘हे’ काय करून बसला? लाईव्ह सामन्यात अभिषेक शर्माचे तपासले खिसे अन्… पहा व्हिडिओ

ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमध्ये गाठला १००० धावांचा टप्पा

सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह, तो आयपीएलमध्ये १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा ९९ वा फलंदाज बनला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळण्यापूर्वी ट्रॅव्हिस हेडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून काही सामने खेळले आहेत.

ट्रॅव्हिस हेडची आयपीएल कारकीर्द

ट्रॅव्हिस हेडने आतापर्यंत त्याने ३२ आयपीएल सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ३७.२५ च्या सरासरीने आणि १७४.०६ च्या स्ट्राईक रेटने १००६ धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच्या ३२ व्या सामन्याच्या अखेरीस, त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५७८ चेंडूंचा सामना केला आहे. त्यामध्ये त्याने  एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.  त्याने आतापर्यंत २५८ सामन्यांमध्ये ८२५२ धावा केल्या आहेत. त्यानंतर शिखर धवन ६७६९ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर रोहित शर्मा २६२ सामन्यांमध्ये ६६८४ धावा करून तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

Web Title: Hyderabads travis head creates history leaving rohit sharma virat kohli behind mi vs srh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • IPL 2025
  • MI vs SRH
  • Travis Head

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
3

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ
4

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.