रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम सुरू आहे. आतापर्यंत ३३ सामने खेळवून झाले आहेत. या दरम्याने खेळाडूंकडून अनेक विक्रम देखील रचले गेले आहेत. आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना काल वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळवण्यात आला आहे. कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजाचीचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने १६२ धावा केल्या. यावेळी अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड हे दोन्ही खेळाडू फार मोठी कामगिरी करण्यास अपयशी ठरले. प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने १९ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले असून त्याच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.
सामन्यादरम्यान, रोहितने मोहम्मद शमीच्या चेंडूवर डीप थर्ड मॅनवर एक जोरदार षटकार लगावत वानखेडे स्टेडियमवर त्याचा १०० वा षटकार पूर्ण केला. रोहित शर्मा आता वानखेडे स्टेडियमवर १०० षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. वानखेडेवर आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला हा पराक्रम करता आलेला नाही.
हेही वाचा : क्रीडा संघटनांच्या कारभाराची होणार चौकशी! सर्वोच्च न्यायालय एक आयोग स्थापन करण्याच्या विचारात..
मुंबई इंडियन्सकडून प्रभावी पर्याय म्हणून आलेल्या रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एक छोटी पण वेगवान खेळी केली. त्याने फक्त १६ चेंडूंचा सामना करत २६ धावा केल्या, ज्यात त्याने तीन शानदार षटकार मारले. तथापि, रोहितला आतापर्यंत या हंगामात कोणतीही मोठी खेळी साकारता आलेली नाही.
खेळाडूंचे नाव मैदानाचे नाव षटकार
या कामगिरीसह, रोहित आयपीएलच्या इतिहासात एका विशिष्ट मैदानावर १०० किंवा त्याहून अधिक षटकार लगावणारा केवळ चौथाच फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ही कामगिरी ख्रिस गेल, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दिग्गजांनी केली होती. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तिन्ही फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. तर वानखेडेवर किरॉन पोलार्डने ८५ षटकार मारले आहेत. वानखेडेवर सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानी आहे.
हेही वाचा : DC vs RR : संदीप शर्माच्या बचावासाठी नितीश राणा मैदानात, म्हणाला, सुपर ओव्हरमधील ‘तो’ निर्णय योग्यच…
खेळाडूंचे नाव सामन्यांची संख्या षटकार
आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत रोहित शर्मा २८६ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. या यादीत ख्रिस गेलने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याने १४२ सामन्यांमध्ये ३५७ षटकार मारलेया आहेत. रोहितनंतर या यादीत विराट कोहलीचा देखील समावेश आहे. विराट २८२ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महेंद्रसिंग धोनी २६० षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे आणि एबी डिव्हिलियर्स २५१ षटकारांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.