Hall of Fame Ms Dhoni: 'I will always cherish this feeling...', Captain Cool MS Dhoni's first reaction on 'Hall of Fame'..
Hall of Fame MS Dhoni : भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’ यामध्ये सामील करण्यात आले आहे. भारताच्या कर्णधारासह इतर विदेशी खेळाडूंना देखील यामध्ये सामील करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन महान सलामीवीर खेळाडू मॅथ्यू हेडन आणि न्युझीलँडचा महान फिरकी गोलंदाज डॅनियम विक्टरी याला सामील करण्यात आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि महान कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झाल्यानंतर बोलताना महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे हा एक सन्मान आहे. पिढ्यानपिढ्या आणि जगभरातील क्रिकेटपटूंच्या योगदानाची दखल घेणारा हा सन्मान आहे. अशा सर्वकालीन महान खेळाडूंसोबत तुमचे नाव लक्षात ठेवणे ही एक अद्भुत भावना आहे. ही भावना मी कायम जपून ठेवेन. बीसीसीआयने ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महेंद्रसिंह धोनीचे अभिनंदन केले आहे. बीसीसीआयने ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. या प्रतिष्ठित यादीत समाविष्ट होणारा तो ११ वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
सोमवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये भारताचा महेंद्रसिंग धोनी आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला आणि ग्रॅमी स्मिथ यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन आणि न्यूझीलंडचा डॅनियल व्हेटोरी, पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीर आणि इंग्लंडची सारा टेलर यांना महिला क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. हा समारंभ लंडनच्या अॅबे रोड स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता.
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झाल्यानंतर धोनीने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नाव मिळणे हा एक मोठा सन्मान आहे, जो पिढ्यानपिढ्या आणि जगभरातील क्रिकेटपटूंच्या योगदानाची दखल घेतो.” असे भारताचा माजी कर्णधार म्हणाला.
हेही वाचा : रियान पराग सांभाळणार या संघाची कमान! भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान दौरा करणार