वेस्ट इंडिज टीम (फोटो-सोशल मीडिया)
WI vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजकडून आपल्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही संघात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच आयोजन करण्यात आले आहे. यासाठी वेस्ट इंडिजने १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये शाई होपचा देखील समावेश करण्यात आला आहे. चार वर्षांनंतर होप पुनरागमन करणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे त्याला बक्षीस देण्यात येऊन २०२१ नंतर त्याला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
२५ जूनपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणारा आहे. पहिली कसोटी केन्सिंग्टन ओव्हल येथील ब्रिजटाऊन येथे सुरू होईल. त्यानंतर दुसरी कसोटी ३ जुलैपासून सेंट जॉर्जिया येथे खेळवण्यात येणार आहे. त्याच वेळी, १२ जुलैपासून किंग्स्टन येथे तिसरी आणि शेवटची कसोटी खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी काही नवीन खेळाडूंना देखील संघात स देण्यात आले आहे.
हेही वाचा : 10 दिवसात श्रेयस अय्यर दुसऱ्यांदा खेळणार फायनल! संघाला चॅम्पियन बनवणार? वाचा अंतिम सामन्याची माहिती
केव्हलेन अँडरसनला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. देशांतर्गत हंगामात चांगली कामगिरी केल्यानंतर गयानाचा फलंदाज केवलन अँडरसनला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात येऊ शकते. अँडरसनच्या समावेशानंतर वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी म्हणाल की, देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अव्वल क्रमात स्थिरता प्रदान करण्यासाठी संघात संधी देण्यात आलेल्या युवा खेळाडू केवलन अँडरसनच्या समावेशाबाबत मी खूप उत्साहित आहे. त्याच वेळी, शाई होपच्या पुनरागमनावर त्यांनी सांगितले की तो मर्यादित षटकांच्या स्वरूपात सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
होपने ३८ कसोटी सामन्यांमध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतके झळकावून १,७२६ धावा फटकवल्या आहेत. २८४ कसोटी विकेट्स घेतलेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज केमार रोचला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात शामार जोसेफचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये वेस्ट इंडिजच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका वठवली होती. ही मालिका २०२५-२७ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचा भाग असणार आहे.
हेही वाचा : निवृतीनंतर या खेळाडूचं नशीब फुललं! MI New York संघाचे सांभाळणार कर्णधारपद
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन, केव्हलन अँडरसन, क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, कीस कार्टी, जस्टिन ग्रीव्हज, शाई होप, टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, जोहान लेन, मिकाईल लुईस, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स.