Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशिया कप 2025 दरम्यान मोहम्मद सिराजला ICC ने केलं सन्मानीत! दिला मोठा पुरस्कार, मियाँची जादू पुन्हा एकदा चालली

इंग्लंड दौऱ्यावर आपल्या शानदार कामगिरीने सिराजने टीम इंडियाला अनेक सामने जिंकण्यास मदत केली. आशिया कप २०२५ मध्ये सिराजला संधी मिळालेली नाही. आयसीसीने ऑगस्ट महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ हा किताब मोहम्मद सिराजला दिला आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 15, 2025 | 03:34 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

आशिया कप २०२५ चा उत्साह कायम आहे. टीम इंडिया उत्तम कामगिरीसह आपली मोहीम पुढे नेत आहे. दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आयसीसीचा मोठा पुरस्कार जिंकला आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाले आहे. आशिया कप २०२५ मध्ये सिराजला संधी मिळालेली नाही. आयसीसीने ऑगस्ट महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ हा किताब मोहम्मद सिराजला दिला आहे. 

कारण या वेगवान गोलंदाजाने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली. इंग्लंड दौऱ्यावर आपल्या शानदार कामगिरीने सिराजने टीम इंडियाला अनेक सामने जिंकण्यास मदत केली. इंग्लंडविरुद्ध भारतासाठी सलग ५ कसोटी खेळून त्याने आपली उत्कृष्ट तंदुरुस्ती सिद्ध केली. कसोटी मालिकेत सिराजने दोनदा ५ बळी घेतले. याशिवाय, इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सिराजने वन-मॅन आर्मीची भूमिका बजावली आणि भारतासाठी सामना जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.

He played a pivotal role in #TeamIndia‘s memorable performances during the tour of England recently! 👌👌

Say hello 👋 to the ICC Men’s Player of the Month for August 2025! 🔝

Congratulations, Mohammed Siraj 👏👏@mdsirajofficial pic.twitter.com/Iach0IDK3w

— BCCI (@BCCI) September 15, 2025

इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ९ डावात ३२.४३ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा जोश टंग दुसऱ्या स्थानावर होता, ज्याने या सामन्यात १९ विकेट्स घेतल्या. शुभमन गिलने या मालिकेत ७५४ धावा केल्या. याशिवाय जो रूट ५३७ धावांसह दुसऱ्या स्थानावर होता.

आशिया कपच्या गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर भारतीय संघाने युएईविरुद्धचा पहिला सामना ९ विकेट्सने जिंकला. त्यानंतर सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला आणखी एका विजयाची आवश्यकता होती. जो भारताने पाकिस्तानविरुद्ध मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाला आणखी २ गुण मिळाले आहेत. भारताने दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून २ सामन्यांमध्ये ४ गुण मिळवले आहेत. टीम इंडियाचा नेट रन रेट +४.७९३ आहे. पाकिस्तानचा संघ २ सामन्यांमध्ये २ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट +१.६४९ आहे. युएई आणि ओमान संघांनी अद्याप आपले खातेही उघडलेले नाही. 

Ind vs Pak No Handshake : भारताच्या संघाने हॅन्डशेक न केल्यामुळे शोएब अख्तर संतापला, म्हणाला – याला राजकीय बनवू…

आता ग्रुप बी बद्दल बोलायचे झाले तर, अफगाणिस्तान संघ १ सामन्यात २ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रन रेट +४.७०० आहे. श्रीलंका संघ दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा संघही २ गुणांसह आहे, परंतु त्यांचा नेट रन रेट +२.५९५ आहे. बांगलादेश संघ तिसऱ्या स्थानावर आहे. २ सामन्यात २ गुणांसह बांगलादेश संघाचा नेट रन रेट -०.६५० आहे. हाँगकाँग संघाचे खाते अद्याप उघडलेले नाही. स्पर्धेचा पुढील सामना यूएई आणि ओमान यांच्यात होणार आहे. ग्रुप बी चा पुढील सामना १५ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि हाँगकाँग यांच्यात होईल.

Web Title: Icc honours mohammed siraj during asia cup 2025 big award given

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • Mohammed Siraj
  • Sports

संबंधित बातम्या

Ind vs Pak No Handshake : भारताच्या संघाने हॅन्डशेक न केल्यामुळे शोएब अख्तर संतापला, म्हणाला – याला राजकीय बनवू…
1

Ind vs Pak No Handshake : भारताच्या संघाने हॅन्डशेक न केल्यामुळे शोएब अख्तर संतापला, म्हणाला – याला राजकीय बनवू…

Asia Cup 2025 : आज रंगणार दोन सामन्याचा थरार, यूएई ओमान भिडणार! सुपर 4 मध्ये जाण्यासाठी श्रीलंका लढणार हाॅंगकाॅंगशी
2

Asia Cup 2025 : आज रंगणार दोन सामन्याचा थरार, यूएई ओमान भिडणार! सुपर 4 मध्ये जाण्यासाठी श्रीलंका लढणार हाॅंगकाॅंगशी

India vs Pakistan : ऑपरेशन सिंदूर 2.0…भारतीय खेळाडूंचा जोरदार हल्ला, भारताने पाकिस्तानी संघाचा कॅम्प केला उद्ध्वस्त
3

India vs Pakistan : ऑपरेशन सिंदूर 2.0…भारतीय खेळाडूंचा जोरदार हल्ला, भारताने पाकिस्तानी संघाचा कॅम्प केला उद्ध्वस्त

IND vs PAK : सामना जिंकल्यानंतर सुर्याने पहलगाम पीडितांना आणि सैन्याला विजय केला समर्पित! पाकच्या जखमांवर चोळले मीठ
4

IND vs PAK : सामना जिंकल्यानंतर सुर्याने पहलगाम पीडितांना आणि सैन्याला विजय केला समर्पित! पाकच्या जखमांवर चोळले मीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.