
दिल्लीत मेस्सीचा जलवा! ICC अध्यक्ष Jay Shah यांनी दिली खास भेट (Photo Credit - X)
जय शाह यांनी मेस्सीचा दौरा केला अविस्मरणीय
या कार्यक्रमात जय शाह यांनी मेस्सीला एक खास ऑटोग्राफ केलेली क्रिकेट बॅट भेट म्हणून दिली. एवढेच नव्हे तर, त्यांनी मेस्सीला आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी आमंत्रित केले आणि आयसीसी टूर्नामेंटचे तिकीटही भेट दिले. मेस्सीला आगामी टी-२० वर्ल्ड कपची खास जर्सीही भेट देण्यात आली, ज्यावर त्याचे नाव लिहिलेले होते. यावेळी फुटबॉलपटू सुनील सुआरेजला ७ नंबरची आणि डी पॉलला ९ नंबरची जर्सी देण्यात आली.
#WATCH | ICC Chairman Jay Shah presents jerseys of the Indian Cricket team to star footballers Lionel Messi, Rodrigo De Paul and Luis Suárez at the Arun Jaitley Stadium in Delhi. Delhi CM Rekha Gupta is also present.#GOATIndiaTour | #Messi𓃵 pic.twitter.com/9fMyAgHwvk — ANI (@ANI) December 15, 2025
युवा खेळाडू आणि माजी फुटबॉलपटूशी भेट
या कार्यक्रमात मेस्सीने मिनर्वा अकादमीच्या युवा फुटबॉलपटूंशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत फोटो सेशन केले. त्यानंतर मेस्सी, सुआरेज आणि डी पॉल यांनी प्रीमियर लीगमध्ये वेस्ट हॅमचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी भारतीय फुटबॉलपटू अदिती चौहान यांचीही भेट घेतली. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांना मेस्सीने फुटबॉल भेट देऊन त्यांचे अभिवादन स्वीकारले.
“भविष्यात नक्की परत येईन
कार्यक्रमाच्या शेवटी लिओनेल मेस्सीने भारताकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आभार मानले. तो म्हणाला, “मला भारतात मिळालेल्या प्रेमासाठी आणि स्नेहासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. हा आमच्यासाठी खरोखरच एक खूप सुंदर अनुभव होता. हे सर्व प्रेम आम्ही आमच्यासोबत घेऊन जात आहोत आणि भविष्यात नक्कीच भारतात परत येऊ. आशा आहे की, आम्ही लवकरच मॅच खेळण्यासाठी किंवा अन्य एखाद्या निमित्ताने नक्कीच येऊ.” या कार्यक्रमानंतर मेस्सी अरुण जेटली स्टेडियममधून बाहेर पडला आणि आपल्या भारत दौऱ्याच्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला.