
ICC : शेफाली-चरणी आयसीसीच्या 'या' पुरस्कारासाठी नॉमिनेट, अभिषेक-गिल पुरुषांच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट
महिला आशियाई चषक 2026 आणि एशियन गेम्स 2026 मधील शानदार कामगिरीनंतर भारताची शेफाली वर्मा आणि श्री चरणी यांच्यासह श्रीलंकेची कर्णधार चामरी अट्टापट्टू यांना सप्टेंबर 2026 साठी ‘आयसीसी वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड’ (ICC) साठी नामांकीत करण्यात आले आहे.
तसेच व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्यासह झिम्बॉब्वेचा अष्टपैलू सिकंदर रजाला सप्टेंबरच्या ‘आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड’साठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.
शेफालीसाठी भारताच्या ओपनिंग बॅटिंग लाइन-अपमध्ये हा महिना खूप शानदार राहिला. तिने सात टी-२० सामन्यात 72 च्या सरासरीने 184.61 च्या स्ट्राइक रेटने 360 धावा केल्या. 22 वर्षीय खेळाडूने गोलंदाजीतही योगदान देत 13 च्या सरासरीने सहा विकेट प्राप्त केले. ती वुमन्स आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू राहिली आणि पाच डावांत 236 धावा तिने केल्या.
तसेच श्री चरणी गोलंदाजीत भारताची सर्वात विश्वासू खेळाडू बनत उदयास येत आहे. डावखुऱ्या स्पिनरने सप्टेंबरमध्ये सात टी-20 सामन्यात 18 विकेट प्राप्त केले. श्री चरणीने भारताच्या यशस्वी आशिया चषक मोहिमेदरम्यान 12 विकेट घेतले, तर एशियन गेम्स 2026 मध्ये प्रतिस्पर्ध्यांचे 8 गडी टिपले.
श्रीलंकेची कर्णधार अट्टापट्टूने अष्टपैलू खेळ दाखवताना संघाला महिला आशिया चषकाच्या सेमिफायनल व त्यानंतर एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यापर्यंत नेले. डावखुऱ्या फलंदाजाने सात टी-20 सामन्यात 37.66 च्या सरासरीने 226 धावा केल्या. त्याशिवाय 6.08 च्या इकॉनॉमी रेटने 14 विकेटही घेतल्या.
IPL 2027: सौरव गांगुली हेड कोच, दिल्ली कॅपिटल जिंकणार? कर्णधारही बदलणार असल्याचे संकेत
Three exceptional performers from the Asia Cup and Asian Games are in the running for the ICC Women’s Player of the Month award for September 2026 🤩 Read more ➡️ https://t.co/tjyD3deezz https://t.co/EVkjVcHFEr — ICC (@ICC) October 6, 2026
पुरुष खेळाडूंचा विचार करता अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांमध्ये टी-20 मालिकेदरम्यान अभिषेकने 76.33 च्या सरासरीने 229 धावा केल्या. त्याने दिल्लीमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात 32 चेंडूंत 82 धावा करत जबरदस्त पुनरागमन केले. अभिषेकने फक्त 22 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताने 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 38 चेंडू शिल्लक राखले. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
त्यानंतर त्याने दुसऱ्या टी-20 सामन्यात 19 चेंडूंत 39 धावा केल्या व त्यानंतर तीन सामन्यांच्या मालिकेत अविस्मरणीय खेळी केली. अभिषेकने फक्त 45 चेंडूंत 108 धावा केल्या आणि 30 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या संपूर्ण कामगिरीनंतर त्याला मालिकावीरचा पुरस्कारही देण्यात आला.
अशाचप्रकारे भारतीय कर्णधार शुभमन गिलसाठीही सप्टेंबर महिना शानदार राहिला, ज्यात त्याने वनडे फॉर्मेटमध्ये रेकॉर्डब्रेक खेळी केली. गिलने तिरुवनंतपुरममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 110 धावा केल्या, तर गुवाहाटीमध्ये नाबाद 223 धावांची खेळी केली. हे दोन्ही सामने भारत जिंकला व मालिका 2-1 असे आपल्या नावे केली.
तसेच सिकंदर रजाने नॉमिनेशन ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत प्रभावशाली खेळीचा नजराणा दाखवला. जागतिक क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रजाने पहिल्या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 57 धावा करत क्रेग इर्विनसोबत 98 धावांची भागीदारी रचली.
रजाने दुसऱ्या वनडेत 45 चेंडूंत 45 धावा केल्या, तर अखेरच्या सामन्यातही त्याने योगदान दिले. एका बाजूला झिम्बॉब्वेचे विकेट पडत असताना तो 29 षटकापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने 72 चेंडूंत नाबाद 81 धावा करत आपल्या संघाची धावसंख्या 271/8 अशी नेली होती.