Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak W vs Ban W: मैदानात फ्लॉप, रील्समध्ये टॉप! पराभवाच्या हॅटट्रिकनंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर; बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय

bangladesh knock pakistan out of women's t20 world cup 2026 :आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 मध्ये बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. या पराभवामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडले असून, त्यांच्या संघावर सोशल मीडियावर ट्रोलिंगही होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 21, 2026 | 04:00 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • पराभवाच्या हॅटट्रिकनंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
  • बांग्लादेशचा ऐतिहासिक विजय
  • सोशल मीडियावर ट्रोलिंग
आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ ( ICC womens t 20 world cup) च्या स्पर्धेत एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. विश्वचषकातील १५ व्या सामन्यात बांग्लादेशने पाकिस्तानचा पराभव करून इतिहास रचला. बांग्लादेशच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फंलदाजांचे कंबरड मोडले. संघाला विजय मिळवून दिला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करल्यानंतर, त्यांना बांग्लादेशविरुद्धही पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाच्या हॅटट्रिकमुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तसेच बांग्लादेशचा टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध हा पहिला विजय आहे. दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्या विजयानंतर जल्लोष कसा करायचा हे दाखवत आहेत. यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर

बांग्लादेशचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना २० षटकांत ६ विकेट्स गमावून केवळ १२३ धावाच करता आल्या. कर्णधार निगार सुलतानाने ३८ चेंडूमध्ये ३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दरम्यान, शोर्ना अख्तरने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक खेळी करत २२ चेंडूंमध्ये नाबाद ३९ धावा केल्या. शोभना मोस्तारीनेही २२ धावांचे योगदान देऊन संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली. दुसरीकडे, पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने सर्वाधिक दोन विकेट्स घेतले. सादिया इक्बाल, तस्मिया रुबाब, नशरा संधू आणि तुबा हसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. पहिल्या डावानंतर पाकिस्तानसमोर एक सोपे लक्ष्य असल्याचे वाटत होते. मात्र, बांग्लादेशच्या गोलंदाजांनी संघाला एक दमदार पुनरागमन करून ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

पाकिस्तानची फलंदाजी उद्ध्वस्त

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. मुनिबा अली आणि गुल फिरौझा यांनी पॉवरप्लेमध्ये एक मजबूत भागीदारी रचली, ज्यामुळे पाकिस्तानने पहिल्या १० षटकांत २ विकेट्स गमावून ६४ धावा केल्या. पण पाकिस्तानला शेवटच्या ६० चेंडूंमध्ये केवळ ६० धावांची गरज होती. याचा अर्थ, धावगतीनुसार पाकिस्तानला प्रति चेंडू केवळ एका धावेची गरज होती. असे असूनही, त्यांचा संघ पूर्णपणे कोसळला. पाकिस्तानचा डाव २० षटकांत ८ विकेट्स गमावून केवळ १०० धावांवर सर्वबाद झाला. बांग्लादेशच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांपासून शेवटपर्यंत पाकिस्तानी फलंदाजांवर दबाव कायम ठेवत उत्कृष्ट गोलंदाजी केली. नाहिदा अख्तर आणि संजिदा अख्तर मेघला यांनीशानदार गोलंदाजी करत प्रत्येकी तीन विकेट्स घेतले. दरम्यान, रबिया खान आणि रितू मोनी यांनी प्रत्येकी एक बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

पाकिस्तान वर्ल्डकपच्या स्पर्धेतून बाहेर

सलग पराभवांमुळे पाकिस्तान गट १ मध्ये संघर्ष करत आहे. त्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले असून, त्या सर्वांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, बांग्लादेशने तीन सामन्यांत दोन विजय मिळवून तिसरे स्थान पटकावले आहे. आता त्यांचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या बलाढ्य संघांशी होणार आहे. पाकिस्तानचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्याशी होईल.

सोशल मीडियावर ट्रोलिंग

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, पाकिस्तान संघाचे सर्व खेळाडू विजयोत्सवाची तयारी करताना दिसत आहेत. कर्णधार फातिमा सना आपल्या सहकाऱ्यांना विजयानंतर कोणत्या प्रकारच्या उत्साही कृती कराव्यात याबद्दल सल्ला देताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला तीव्र ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सलग तीन सामने गमावल्याबद्दल चाहते या रीलद्वारे आपला संताप व्यक्त करत आहेत. युजरचे म्हणणे आहे की, जर त्यांनी रील बनवण्याऐवजी खेळण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले, तरच त्यांना विजयाचा खरा आनंद साजरा करण्याची संधी मिळेल. एका युजरने लिहिले आहे की, महिला संघ देखील पाकिस्तानी पुरुष संघाकडूनच प्रेरणा घेत आहे. ते पराभूत आहेत आणि त्याही पराभूतच आहेत.

Pakistan Women Cricket Team 🤡 – They are making reels on how they’ll celebrate winning, but they haven’t even won a game yet 🤣 – Instead of practising on the ground to win a match, they are busy making reels.#PAKWvsBANW #PAKvsBAN #PCB #T20WorldCup #CricketTwitter pic.twitter.com/eRBVtBrUHs — Paras (@atheistParas) June 20, 2026

IND W vs SA W: भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, हरमनप्रीत कौर रचणार इतिहास; 200 वा टी20 सामना खेळणार

Web Title: Icc womens t20 world cup 2026 bangladesh beat pakistan upset eliminated pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Bangladesh vs Pakistan
  • ICC Women's T20 World Cup
  • ICC Womens World Cup

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.