गयाना : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India, Vs west Indies) यांच्यातील पाच टी-20 मालिका (T20 Series) सुरु आहे. पहिला आणि दुसरा टी-20 सामना (WI vs IND 1st T20) वेस्ट इंडिड जिंकल्यानंतर काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताला आव्हान कायम ठेवण्यासाठी करो या मरो अशी स्थिती होती, रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही (WI vs IND T20) भारताच्या पदरी पुन्हा हार आली होती. पहिल्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव झाला होता. यानंतर काल तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा सात विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 160 धावांचे आव्हान भारताने सात विकेट आणि 13 चेंडू राखून सहज पार केले. सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतक झळकावले त्याशिवाय तिलक वर्मा याने नाबाद 49 धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने कमबॅक केलेय. पहिले दोन्ही सामने विडिंजने जिंकले होते. त्यामुळं आता 2-1 अशी मालिका आहे. (in the third t twenty match india won by seven wickets comeback in the series)
सूर्या तळपला…, भारताची खराब सुरुवात
दरम्यान, सूर्याने फक्त 23 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले.सूर्याच्या टी 20 कारकीर्दीतील हे 14 वं अर्धशतक ठरलं. विजयी धावांचं पाठलाग करताना टीम इंडियाने लवकरच 2 विकेट्स गमावले. करिअरच्या पहिल्याच सामन्याच यशस्वी जयस्वाल दुसऱ्याच बॉलवर 1 रन करुन आऊट झाला. तर शुबमन गिल याने पुन्हा निराशा केली. शुबमन 6 रन्स करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाची 2 बाद 34 अशी स्थिती झाली. मात्र सूर्याच्या झंझावातापुढे विजय सोपा झाला. सूर्यान चौफेर फटकेबाजी केली. सूर्याने 23 बॉलमध्ये 217.39 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. तिलक वर्माने नाबाद 49 धावा केल्या.
वेस्ट विंडीज 160 धावांचे आव्हान
कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. काइल मेयर्स याने 20 चेंडूत 25 धावांची खेळी केली. त्यानंतर जोनसन चार्ल्स आणि किंग यांनी विडिंजचा डाव सावरला. कुलदीप यादव याने लागोपाठ दिल फलंदाजांना तंबूत पाठवले. कुलदीप यादव याने चार्ल्स याला 12 धावांवर बाद केले. त्यानंतर धोकादायक निकोलस पूरन याला 20 धावांवर बाद केले. एक बाजू लावून धरणाऱ्या ब्रेंडन किंग याला 42 धावांवर कुलदीपने बाद केले. लागोपाठ विकेट पडल्यामुळे विडिंजच्या धावसंख्या 159 करता आली. भारताला विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले.