Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

IND vs AFG : भारत व अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार दिल्ली पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी त्यांनी आतापर्यंत १९ जणांना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 18, 2026 | 04:29 PM
Team India

Team India

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली पोलिसांची धडक कारवाई
  • क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार
  • तीन दिवस चालली मोहिम
 

नवी दिल्ली : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG)  यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत पार पडली, ज्यात भारताने ३-० असा एकतर्फी विजय प्राप्त केला.  या मालिकेदरम्यान दिल्ली पोलिसांच्या एका धडक कारवाईने सर्वांचे लक्ष वेधले असून क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे यश त्यांच्या हाती लागले आहे. अरुण जेटली स्टेडियमच्या परिसरात अनधिकृतपणे तिकिटांची विक्री केल्याबाबत  दिल्ली पोलिसांनी तब्बल १९ जणांना ताब्यात घेतले आहे.

७१ तिकिट आणि ७,४०० रुपये जप्त

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेदरम्यान तीन दिवसांपर्यंत पोलिसांनी एक विशेष मोहिम राबवली. या मोहिमेचे उद्दीष्ट तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणे होते. याप्रकरणी आतापर्यंत एकूण १३ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. कारवाईत अटक करण्यात आलेल्या १९ आरोपींकडे क्रिकेट सामन्यांचे ७१ तिकिटे व ७ हजार ४०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी स्टेडियम परिसरात जाळं पसरले होते. तसेच डिकॉय म्हणजेच नकली ग्राहक बनत हा तिकिटांचा काळाबाजार त्यांनी जनतेसमोर आणला. खासकरून दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, एमजी मार्ग, बीएसझेड मार्ग आणि जेपीएन पार्कसमवेत स्टेडियमच्या जवळच्या परिसरातील संशयास्पद व्यक्तींची चौकशी वाढवण्यात आली होती. या मालिकेचे तीनही सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्येच पार पडले होते.

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप

तीन दिवस चालली मोहिम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आरोपी कमी किंमतीत तिकिट मिळवून ही तिकिटे क्रिकेट सामना पाहण्यास येणाऱ्या क्रिकेटप्रेमींना चढ्या भावाने विकण्याच्या प्रयत्नात होते. साधारणपणे अधिकृत वेबसाइटवरील तिकिटांची विक्री पूर्ण झाल्यानंतर सामना पाहण्यासाठी येणारे क्रिकेटप्रेमी कोणत्याही किंमतीत तिकिट विक्री घेण्यास तयार होतात. हाच फायदा घेत काळाबाजार करणाऱ्या टोळीने तिकिटांचे भाव अव्वाच्या सव्वा ठेवला होता. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी १३ सप्टेंबर, १५ सप्टेंबर व १७ सप्टेंबर असे तीन दिवस मोहिम चालवली व या टोळीचा पर्दाफाश केला.

पहिल्या सामन्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच १४ सप्टेंबरला चार एफआयआर दाखल झाल्या, ज्यात पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २९ तिकिटे व ३ हजार ४०० रुपये प्राप्त करण्यात आले. तर दुसऱ्या सामन्याच्या वेळी सहा एफआयआर दाखल करत १० जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३१ तिकिटे व चार हजार रुपये पोलिसांना आढळले. तसेच १७ सप्टेंबरला तीन एफआयआरमध्ये चार आरोपींकडून ११ तिकिटे जप्त करण्यात आली.

या सर्व प्रकरणी दिल्ली प्रिवेंशन ऑफ टाउंटिंग अॅण्ड मॅलप्रॅक्टिसेस अगेंस्ट टूरिस्ट्स अॅक्ट, २०१० च्या कलमांतर्गत ४(सी) कारवाई करण्यात आली.

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

Web Title: Ind vs afg t 20 series delhi police action on ticket black marketing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • Delhi Police
  • IND vs AFG

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप
2

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
3

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
4

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.