Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रेयस अय्यरला मोठी दुखापत; अय्यरचे ‘हे’ ठरवता त्याला भारताचा स्टार खेळाडू; एकदा वाचाच

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरल दुखापत झाली आहे. श्रेयस अय्यर हा भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 27, 2025 | 07:20 PM
Shreyas Iyer suffers major injury; Iyer's 'he' makes him India's star player; Read it once

Shreyas Iyer suffers major injury; Iyer's 'he' makes him India's star player; Read it once

Follow Us
Close
Follow Us:

Shreyas Iyer suffers major injury : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव केला.  परंतु, या सामन्यात भारतीय संघासाठी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावावेळी श्रेयस अय्यरला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला.  आता सिडनीतील एका रुग्णालयात आहे. त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहे. बीसीसीआयकडून  उपकर्णधार श्रेयस अय्यरबाबत एक वैद्यकीय बुलेटिन जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा : शतक झळकावल्यानंतर करुण नायरने निवडकर्त्यांवर साधला निशाणा! टीम इंडियामधून वगळल्याबद्दलचा व्यक्त केला राग

श्रेयसची दुखापत किती गंभीर?

बीसीसीआयने श्रेयसच्या दुखापतीबाबत प्रेस रिलीज जाहीर केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “श्रेयसच्या दुखापतीच्या स्कॅनमध्ये प्लीहाची दुखापत दिसून आली. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो बरा होत आहे.” बीसीसीआयचे वैद्यकीय पथक, सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करत असून, त्याच्या दुखापतीचे बारकाईने निरीक्षण करत आहे.

‘तो’ एक झेल आणि दुखापत…

सिडनी वनडेमध्ये, रेनशॉ आणि अॅलेक्स कॅरीची जोडी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी मोठी भागीदारी करत होते. तेव्हा ३४ व्या षटकात, बॅकवर्ड पॉइंटवरून थर्ड मॅनकडे धावणाऱ्या श्रेयस अय्यरने अॅलेक्स कॅरीचा एक अप्रतिम झेल घेतला. यादरम्यान, श्रेयस अय्यरला दुखापत झाली आणि तो वेदनेने विव्हळत होता. त्याला डाव्या बरगडीला दुखापत झाली.

श्रेयस अय्यर भारताचा हुकूमी एक्का

श्रेयस अय्यर हा नहेमीच त्याच्या संघाला प्रथम प्राधान्य देत असतो. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचे ही चित्र स्पष्टपणे दिसून  येते. या वर्षीच्या आयपीएल २०२५  च्या १८ व्या हंगामात त्याने आपल्या पंजाब संघाला नेतृत्वासोबतच आपल्या फलंदाजीच्या जोरावर आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचवले.   तसेच चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील त्याने आपल्या बॅटने संघाला वेळोवेळी मदत केली आणि भारताने चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजवली. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा काढून दुसऱ्या स्थानी होता.

श्रेयस अय्यरची आकडेवारी

अय्यरने ४८ च्या सरासरीने ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ७३ झेल घेतले आहेत. शिवाय, १४ कसोटी सामन्यांमध्ये १५ झेल, ५१ टी-२० सामन्यांमध्ये १६, ८३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६५, १५४ लिस्ट ए सामन्यांमध्ये ६७ आणि आयपीएलसह सर्व २४० देशांतर्गत टी-२० सामन्यांमध्ये १०२ झेल घेतलेल्या श्रेयसने त्याच्या क्षेत्ररक्षणाचे त्याच्या संघात किती महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ही आकडेवारी त्याची क्षमता सिद्ध करते आणि त्याला एक खास खेळाडू बनवते.

हेही वाचा : Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर

 

Web Title: Ind vs aus shreyas iyer who suffered a serious injury against australia is a special player for india marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

‘त्यानंतर रोहित आणि विराटची..’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर कोच गंभीरने ड्रेसिंग रुममध्ये केले मन मोकळे; पहा Video
1

‘त्यानंतर रोहित आणि विराटची..’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर कोच गंभीरने ड्रेसिंग रुममध्ये केले मन मोकळे; पहा Video

IND vs AUS: विराट कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी अभिषेक शर्मा सज्ज! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील ३ डावांमध्ये करावी लागेल ‘ही’ कामगिरी
2

IND vs AUS: विराट कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी अभिषेक शर्मा सज्ज! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील ३ डावांमध्ये करावी लागेल ‘ही’ कामगिरी

IND VS AUS : अरे रे! भारताच्या नशिबी हे काय? 18 ODI सामन्यात TOSS ने दाखवली पाठ; कर्णधार बदलला पण….
3

IND VS AUS : अरे रे! भारताच्या नशिबी हे काय? 18 ODI सामन्यात TOSS ने दाखवली पाठ; कर्णधार बदलला पण….

Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर
4

Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.