फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती, त्यामुळे तो खेळू शकला नाही. अलिकडेच असे उघड झाले की श्रेयस अय्यरला अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो आयसीयूमध्ये होता, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. बीसीसीआयने आता अय्यरच्या दुखापतीबद्दल अधिकृतपणे अपडेट दिले आहे, ज्यामध्ये तो आता वैद्यकीयदृष्ट्या स्वच्छ असल्याचे म्हटले आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी चाहत्यांच्या चिंता दूर केल्या आणि अय्यर पूर्वीपेक्षा चांगला असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “२५ ऑक्टोबर २०२५ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला बरगडीला दुखापत झाली. त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. स्कॅनमध्ये पोटात दुखापत झाल्याचे दिसून आले.”
बीसीसीआयच्या सचिवांनी पुढे सांगितले की, “त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तो वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहे आणि त्याची प्रकृती सुधारत आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करत आहे आणि त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय संघाचे डॉक्टर सिडनीमध्ये श्रेयस अय्यरसोबत असतील आणि त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवतील.”
Get well soon , shreyas iyer! wishing you a speed recovery 💪 — Uttam Kumar (@ukt_007) October 27, 2025
श्रेयस अय्यरला रुग्णालयात दाखल केल्यानंतर चाहते चिंतेत आहेत. सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडियावर अय्यरच्या चाहत्यांचा प्रतिक्रिया येत आहेत आणि त्याच्यासाठी ते प्रार्थना करत आहेत.
Hoping TO GET ABSOLUTELY 💯 FINE BEFORE SOUTH AFRICA 🇿🇦 SERIES — दॉव-पेंच🔆 (@ArvindAk7) October 27, 2025
श्रेयस अय्यर हा टीम इंडियाच्या एकदिवसीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करून टीम इंडियाला स्थिरता प्रदान करतो. अय्यर लवकरच बरा होईल आणि भारतीय संघात परतेल याची चाहते उत्सुक आहेत. भारताचा संघ हा आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळताना दिसणार आहे. ही मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेमध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत, या संघाचे कर्णधारपद हे सुर्यकुमार यादवकडे असणार आहे.






