फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. यासाठी भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये घाम गाळत आहे. भारताच्या संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये तिसऱ्यांदा जिंकण्याची म्हणजेच तिसऱ्यांदा हॅट्रिक मारण्याची संधी आहे. भारताच्या संघाने १८ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे यामध्ये नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, आकाशदीप यासारखे काही नवे चेहरे आहेत तर काही विराट कोहली, जसप्रीत बुमराह रविचंद्रन अश्विन सारखे दिग्गज खेळाडू संघामध्ये आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी पर्थच्या खेळपट्टीची पहिली झलक समोर आली आहे. चित्रे पाहता पर्थच्या खेळपट्टीवर फलंदाजांना धावा काढणे सोपे जाणार नाही, असे दिसून येत आहे. असे म्हंटले जात आहे की, खेळपट्टीवर भरपूर गवत आहे आणि ती हिरवीगार खेळपट्टी असल्याने वेगवान गोलंदाजांना त्याचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, पर्थ कसोटीपूर्वी, या मैदानावर खेळले गेलेले एकूण कसोटी सामने आणि त्यांचे निकाल जाणून घेऊया.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून पर्थ कसोटी सामना रंगणार आहे. पर्थची खेळपट्टी चांगली उसळी आणि वेग देईल कारण पर्थच्या खेळपट्ट्या पारंपारिकपणे ओळखल्या जातात. 2018 ते 2023 या कालावधीत पर्थ स्टेडियमवर एकूण 4 कसोटी सामने खेळले गेले, ज्यामध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी निवडून चारही सामने जिंकले.या मैदानारवर सर्वोच्च धावसंख्या 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 598/4d केली आहे. तर सर्वात कमी धावसंख्या पाकिस्तानने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. पाकिस्तानने फक्त 89 धावा सामन्यात केल्या होत्या.
या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज मार्नस लॅबुशेन हा आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्टीवर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज नॅथन लियॉन हा आहे, त्याने एकूण 27 विकेट्स घेतले आहेत.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे खेळलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, येथे दोन्ही संघांमध्ये फक्त 1 सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाला 146 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा सामना 14 डिसेंबर 2018 रोजी खेळला गेला.
२२-२६ नोव्हेंबर: पहिली कसोटी, पर्थ
६-१० डिसेंबर: दुसरी कसोटी, ॲडलेड
१४-१८ डिसेंबर: तिसरी कसोटी, ब्रिस्बेन
२६-३० डिसेंबर: चौथी कसोटी, मेलबर्न
०३-०७ जानेवारी: पाचवी कसोटी, सिडनी