
फोटो सौजन्य - shubmangill सोशल मिडिया
India vs New Zealand 1st ODI Pitch Report : न्यूझीलंडविरुद्ध मालिकेला 11 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे, पहिला सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. पहिला सामना हा वडोदराच्या कोटाम्बी स्टेडियममध्ये पहिल्यांदाच भारतीय पुरुष संघाचा सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रविवारी या मैदानावर खेळवला जाणार आहे.
आतापर्यंत या मैदानावर फक्त महिलांचे आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. याशिवाय, या स्टेडियममध्ये देशांतर्गत क्रिकेट सामने देखील आयोजित केले गेले आहेत, परंतु पुरुष संघाचा आंतरराष्ट्रीय सामना होण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळे सर्वांच्या नजरा मैदानावर आहेत. क्रिकेटमध्ये खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावते. खेळपट्टी फिरकीपटूंना, वेगवान गोलंदाजांना किंवा फलंदाजांना अनुकूल आहे की नाही यावर आधारित संघ त्यांचे प्लेइंग इलेव्हन निवडतात. भारत आणि न्यूझीलंड वडोदरा येथे आले आहेत आणि त्यांनी सराव केला आहे. हे स्पष्ट आहे की दोन्ही संघांनी खेळपट्टीवर एक नजर टाकली आहे.
GT vs UP, WPL 2026 : आज यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स आमनेसामने! पहिल्या विजयासाठी करणार प्रयत्न
देशांतर्गत सामने आणि महिला संघांच्या सामन्यांचा विचार करता, येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे दिसून येते. डिसेंबर २०२४ मध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती, ज्यामध्ये भारताने दोन सामन्यांमध्ये ३०० धावांचा टप्पा सहज ओलांडला होता. यावरून असे सूचित होते की येथे फलंदाजांना मैदानी खेळाचा आनंद मिळेल आणि चाहत्यांना पुन्हा धावांचा पाऊस पडला तर आश्चर्य वाटू नये.
नाणेफेक जिंकल्यानंतर, प्रत्येक संघ प्रथम गोलंदाजी करू इच्छितो. याचे कारण दव आहे. भारतात सध्या हिवाळा आहे, त्यामुळे रात्री दव पडतो, ज्यामुळे चेंडू पकडणे कठीण होते. दुसऱ्या डावात, चेंडू बॅटवर सहजपणे येतो आणि गोलंदाजांना त्यांची लाईन आणि लेंथ राखण्यात अडचण येते. त्यामुळे, नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल.
𝗥𝗼𝗞𝗼 𝗥𝗲𝗹𝗼𝗮𝗱𝗲𝗱 🔁 Virat Kohli 🤝 Rohit Sharma ready for the #INDvNZ ODIs 💪#TeamIndia | @IDFCFIRSTBank | @imVkohli | @ImRo45 pic.twitter.com/8xWIo7CtBm — BCCI (@BCCI) January 10, 2026
या मालिकेत, बहुतेकांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असेल, जे आता फक्त एकदिवसीय सामने खेळतील. या मालिकेनंतर, हे दोघेही आयपीएलमध्ये आणि नंतर जुलैमध्ये थेट इंग्लंड दौऱ्यावर दिसतील. दरम्यान, टीम इंडियाचा नवा एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल देखील या मालिकेत पुनरागमन करत आहे. कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात तो जखमी झाला होता. त्यामुळे तो एकदिवसीय मालिकेत खेळू शकला नाही. आता तो पुनरागमन केला आहे. दरम्यान, एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जखमी झाला होता आणि तोही या मालिकेत पुनरागमन करत आहे.