Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानच्या बाबर आझमला धोबीपछाड! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये रचला ‘हा’ इतिहास

वैभव सूर्यवंशी आता १६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने पाकिस्तानचा बाबर आझमला मागे टाकले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 27, 2025 | 04:33 PM
Vaibhav Suryavanshi beats Pakistan's Babar Azam to become the first bowler to create 'this' history in youth ODIs

Vaibhav Suryavanshi beats Pakistan's Babar Azam to become the first bowler to create 'this' history in youth ODIs

Follow Us
Close
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशी एकामागून एक विक्रम रचत आहे.
  • वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानचा बाबर आझमला मागे टाकले. 
  • सूर्यवंशी युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज 

Vaibhav Suryavanshi created a record : भारताचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी एकामागून एक विक्रम रचत आहे. त्याने आता आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडला आहे.  वैभव सूर्यवंशीने १६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने १६ धावा करून ही कामगिरी करून दाखवली आहे.  याआधी, वैभव सूर्यवंशीने  पहिल्या दोन सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात मोठी कामगिरी केली. पहिल्या  सामन्यात ३८ आणि दुसऱ्या सामन्यात त्याने ७० धावा केल्या.

हेही वाचा : IND VS PAK : ‘आम्ही त्याच पद्धतीने खेळू…’, अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला सूर्याचा अनोख्या शैलीत इशारा..

ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्धचा तिसरा सामना शुक्रवारी खेळला गेला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.  भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे फक्त चार धावा करून माघारी परतला आणि सूर्यवंशी फक्त १६ धावा करून बाद झाला. तथापि, या काळात वैभव सूर्यवंशीने एक महत्त्वाचा विक्रम रचला आहे.

वैभव सूर्यवंशीची शानदार कामगिरी

वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ डावात ५०.६४ च्या सरासरीने ५५६ धावा फटकवल्या आहेत. सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३ षटकार मारण्याची किमया साधली आहे.  युवा एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात या खेळाडूने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत.  त्याने उन्मुक्त चंदचा विक्रम मोडीत काढला आहे. ज्याने युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ३८ षटकार मारण्याची किमया साधली होती.

१६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  1. हसन रझा: ७२७ धावा
  2. वैभव सूर्यवंशी: ५५६ धावा
  3. बाबर आझम: ५५२ धावा
  4. नजमुल हुसेन शांतो: ५४६ धावा
  5. अहमद शहजाद: ५१० धावा

भारताच्या वैभव सूर्यवंशीने बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला आहे. आता फक्त पाकिस्तानचा हसन रझा हा एकमेव खेळाडू त्याच्या पुढे आहे. १६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये हसन रझा ७२७ धावांसह यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने १९९७-९८ मध्ये ही कामगिरी केली होती.  वैभव सूर्यवंशी आता हसन रझा नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा : IND vs SL: कुलदीप यादवने वाढवली पाकिस्तानची चिंता! अंतिम सामन्यापूर्वी रचला मोठा इतिहास; वाचा सविस्तर

वैभव सूर्यवंशीकडून आणखी एक विक्रम काबिज

वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध युवा एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू बनला आहे. त्याने हसन रझा यांचा विक्रम मोडीत काढला आहे. केवळ १४ वर्षे आणि १८१ दिवसांच्या वयात, वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम रचला आहे.

Web Title: Ind vs aus vaibhav suryavanshi creates history in odis by surpassing babar azam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND U19 Beat AUS U19: युवा भारतीय संघाची धमाकेदार कामगिरी! ऑस्ट्रेलियाला मालिकेत धूळ चारत ३-० ने मिळवला विजय
1

IND U19 Beat AUS U19: युवा भारतीय संघाची धमाकेदार कामगिरी! ऑस्ट्रेलियाला मालिकेत धूळ चारत ३-० ने मिळवला विजय

IND vs AUS : Vaibhav Suryavanshi ने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केला पराक्रम! वेदांत त्रिवेदीने केला कहर
2

IND vs AUS : Vaibhav Suryavanshi ने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केला पराक्रम! वेदांत त्रिवेदीने केला कहर

IND U19 Beat AUS U19: भारतीय युवा संघाचा जलवा कायम; कांगारुना ५१ धावांनी लोळवलं, फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल
3

IND U19 Beat AUS U19: भारतीय युवा संघाचा जलवा कायम; कांगारुना ५१ धावांनी लोळवलं, फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल

Vaibhav Suryavanshi New Record: वैभव सूर्यवंशीची ऑस्ट्रेलियात विक्रमी कामगिरी; षटकारांचा पाऊस पाडत रचला इतिहास
4

Vaibhav Suryavanshi New Record: वैभव सूर्यवंशीची ऑस्ट्रेलियात विक्रमी कामगिरी; षटकारांचा पाऊस पाडत रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.