फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश : भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत बांग्लादेशच्या संघाला कालच्या सामन्यात चांगलंच धुतलं. भारताच्या संघाला एकही चान्स न देता बांगलादेशला मालिकेमध्ये ३-० ने पराभूत केलं आहे मालिका नावावर केली आहे. भारताच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये अविश्वसनीय कामगिरी करून बांग्लादेशच्या विरुद्ध सर्वात मोठी T२० फॉरमॅटमधील धावसंख्या उभी केली. टीम इंडियाने कालच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या संघाने पहिला विकेट लवकर गमावला होता. त्यानंतर सामन्यात बांग्लादेशसाठी संजू सॅमसन आणि कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नावाचे वादळ आले आणि धावांचा पाऊस केला.
कालच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने सर्वात मोठी धावसंख्या २९७ उभी केली होती. त्यानंतर भारताचा फलंदाज संजू सॅमसनने सर्वात जलद गतीने शतक ठोकले. भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत कालच्या सामन्यांमध्ये अनेक रेकॉर्ड मोडले ते विक्रम कोणते होते यावर एकदा नजर टाका.