Asia Cup 2025: India has 'these' three options for opening! What will Team India's playing-11 be in the Asia Cup? Find out
Team India’s playing 11 in the Asia Cup : आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवकडे संघाची धुरा असणार आहे तर शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. आशिया स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. भारत १० ऑगस्ट रोजी संयुक्त अरब अमिराती विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. आता १५ सदस्यीय संघाची घोषणा केल्यानंतर स्पर्धेत भारताचा प्लेइंग-११ कसा असणार आहे? याबाबत आपण माहिती घेऊया.
भारतीय संघाकडे अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि संजू सॅमसन असे ३ सलामीचे पर्याय उपलब्ध आहेत. अभिषेक फक्त सलामीला उतरतो तर शुभमन आणि सॅमसन क्रमांक-३ वर खेळू शकतात. गिलच्या अनुपस्थितीत सॅमसन आणि अभिषेकने डावाची सुरुवात केली होती. या दरम्यान अभिषेकने २ शतके झळकावली तर सॅमसनने ३ शतके झळकावली आहेत. आता गिल उपकर्णधार असल्याने त्याचे खेळणे देखील निश्चित मानले जात आहे. जर तो सलामीला आला आणि डाव्या-उजव्या जोडीचा अवलंब केला तर सॅमसनला क्रमांक-३ वर फलंदाजी करावी लागणार आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
संजू सॅमसन आणि जितेशपैकी एकाला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवडायचे असेल, तर व्यवस्थापन ३ शतके झळकावणाऱ्या सॅमसनला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जर तिलकला संधी दिली तर सॅमसनला वगळण्याची शक्यता आहे. कारण सॅमसनला टॉप-३ स्थानाबाहेर खेळणे शक्य होणार नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव निश्चितपणे क्रमांक-४ वर खेळणार आहे. जर उजव्या हाताच्या सलामीवीराची विकेट प्रथम गेली तर सूर्या देखील क्रमांक तीनवर येऊ शकतो.
प्रशिक्षक गौतम गंभीरने आतापर्यंत अष्टपैलू खेळाडूंना जास्तीत जास्त संधी दिली आहे. टी-२० संघात हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांच्या रूपात ३ अष्टपैलू खेळाडू उपलब्ध आहेत. तिघेही ५, ६ आणि ७ क्रमांकांवर खेळण्याची क्षमता आहे. हार्दिक आणि अक्षर ४-४ षटके देखील टाकू शकतात. गरजेस दुबेही षटके टाकण्यास सक्षम आहे. त्यासोबतच दुबे आणि हार्दिक हे फिनिशरची भूमिका देखील बाजवण्यास सज्ज आहेत. तर अक्षर डाव सांभाळू शकतात आणि फिनिशिंगही करू शकतात.
टीम मॅनेजमेंटने सॅमसनला बाहेर ठेवले तर मात्र जितेश शर्माला ५, ६ किंवा ७ क्रमांकावर फिनिशरची भूमिका बजावावी लागणार. आशा वेळी संघ फक्त २ ऑलराउंडरना प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट करू शकतो. कारण गोलंदाजांची शेवटची ४ ठिकाणे जवळजवळ निश्चित करण्यात आली आहेत.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..
अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांचे अंतिम ११ मध्ये खेळणे निश्चित आहे. तिघेही ९ ते ११ क्रमांकावर फलंदाजी करतील, कारण तिघांचीही फलंदाजीची बाजू कमकुवत आहे. जर खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल तर कुलदीप यादवला ८ क्रमांकावर संधी मिळण्याची शक्यता आहे. जर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना उपयुक्त असेल तर कुलदीपच्या जागी हर्षित राणाला संधी दिली जाऊ शकते.
आशिया कपसाठी भारताचा संभाव्य प्लेइंग-११:
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.