फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश : भारताच्या संघाने बांग्लादेशविरुद्ध नुकतीच दोन सामान्यांची कसोटी मालिका खेळली. यामध्ये भारताच्या संघाने या मालिकेवर एकतर्फी विजय मिळवला. भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना झाला यामध्ये भारताच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २८० धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पावसाने खेळ खराब केला होता. यावेळी भारताच्या संघाने त्या सामन्यात ७ विकेट्सने सामना जिंकून मालिका २-० ने जिंकली. आता भारताचा संघ लवकरच ६ ओक्टोबरपासून T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली T20 मालिकेसाठी मैदानात घाम गाळत आहे.
भारत विरुद्ध बांग्लादेश मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृयत्वाखाली ६ ऑक्टोबरपासून मालिकेला सुरुवात करणार आहे. यासाठी भारतीय संघाचे गोलंदाज मैदानात घाम गाळत आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये भारताचे वेगवान गोलंदाज हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह, मयंक अग्रवाल आणि हर्षित राणा मैदानामध्ये घाम घालताना दिसत आहेत.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सस्सामन, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.