भारताची दमदार तिकडी अर्थात ट्रिपल R ने सांभाळली धुरा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्याचा तिसरा दिवस संपला आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव ३८७ धावांवर संपला. अशाप्रकारे, पहिल्या डावात इंग्लंडने केलेल्या ३८७ धावांच्या प्रत्युत्तरात, टीम इंडियाची धावसंख्याही बरोबरीत राहिली. पाहुण्या भारतीय संघाला एकही धाव आघाडी म्हणून मिळवता आली नाही.
भारतीय संघाकडून केएल राहुलने या डावात शानदार शतकी खेळी केली. त्याने १७७ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. याशिवाय, ऋषभ पंतने ७४ आणि रवींद्र जडेजाने ७२ धावांचे योगदान दिले. त्याच वेळी, मधल्या फळीत नितीश कुमार रेड्डी यांनी ४४ धावांची महत्त्वाची खेळी केली (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
इंग्लंडचा पुढचा डाव सुरू
अगदी 10 मिनिट्स शिल्लक असताना इंग्लंडचा पुढचा डावा सुरू झाला आणि त्याच वेळी, इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात १ षटकात २ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या डावादरम्यान, जस क्रॉली आणि भारतीय कर्णधार शुभमन गिल यांच्यात जोरदार वाद झाला. खरंतर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपायला काही मिनिटेच शिल्लक होती आणि जसप्रीत बुमराह पहिले षटक टाकत होता. अशा परिस्थितीत क्रॉली वारंवार जाणूनबुजून स्टान्स घेण्यात वेळ वाया घालवत होता. म्हणूनच शुभमन गिलने आपला निषेध व्यक्त केला आणि त्यांच्यात वाद झाला.
Eng Vs Ind: पंतने रिचर्ड्सला टाकले मागे, ‘सिक्सर किंग’ चा किताब नावावर करण्यासाठी हव्यात इतक्या ‘6’
ख्रिस वोक्सची कमाल बॉलिंग
इंग्लंडच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर ख्रिस वोक्सने सर्वाधिक म्हणजे ३ बळी घेतले. याशिवाय जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सनेही २-२ बळी घेतले तर ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी १-१ बळी घेतले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी विशेषतः टीम इंडियाच्या खालच्या फळीतील फलंदाजांविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली, ज्यामुळे इंग्लंडचा संघ धावसंख्या बरोबरीत ठेवण्यात यशस्वी झाला.
चहापानानंतर भारताचा संघ गारद
इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चहापानानंतर टीम इंडियाचा डाव डळमळीत झाला. चहापानाच्या ब्रेकपर्यंत टीम इंडियाने ५ विकेट गमावून ३१६ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर शोएब बशीरने केएल राहुलला बाद करून इंग्लंडला पुन्हा सामन्यात आणले.
राहुल बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी काही काळ डाव सावरायला मदत केली आणि धावसंख्या ३५० धावांच्या पुढे नेली, परंतु त्यानंतर जडेजा आणि रेड्डी यांनी जलद धावा काढण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट्स गमावल्या, ज्यामुळे भारताची धावसंख्या इंग्लंडच्या धावसंख्येला ओलांडू शकलेली नाही.
इंग्लंडच्या ३८७ धावा
भारताविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३८७ धावा केल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने चांगली सुरुवात केली पण ४३ धावांवर त्यांची विकेट गेली. तर, ऑली पोप आणि जो रूट यांनी मिळून पहिल्या डावावर ताबा मिळवला. इंग्लंडकडून जो रूटने जोरदार फलंदाजी केली आणि १०४ धावा केल्या. याशिवाय जेमी स्मिथने ५१ आणि ब्रायडन कार्सने ५६ धावांचे योगदान दिले.
दुसरीकडे, टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर, जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा भारताकडून डावाला सुरूवात केली आणि ७४ धावांत पाच बळी घेतले. याशिवाय, टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांनीही प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर रवींद्र जडेजानेही एक बळी घेऊन इंग्लंडवर दबाव आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.