रिषभ पंतने मोडला विव्ह रिचर्ड्सचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लंचच्या आधी शेवटच्या षटकात विकेट दिल्याबद्दल ऋषभ पंतवर सर्व बाजूंनी टीका होईल, परंतु ११२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७४ धावांच्या या खेळीसह, पंतने पुन्हा एकदा इंग्लंडवरील त्याचे प्रेम आणि या देशात खेळणे त्याला किती आवडते हे व्यक्त केले.
या खेळीद्वारे ऋषभ पंतने अनेक पराक्रम केले आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने मारलेल्या 6. ख्रिस वोक्सने टाकलेल्या ५९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पंतने षटकार मारला आणि यासह तो सर व्हिव्ह रिचर्ड्सना मागे टाकत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याने आता विव्ह रिचर्ड्सचा रेकॉर्ड मोडला आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
३५ – ऋषभ पंत
३४ – व्हिव्ह रिचर्ड्स
३० – टिम साउदी
२७ – यशस्वी जयस्वाल
२६ – शुभमन गिल
नजर आता ‘सिक्सर किंग’ किताब मिळविण्याकडे
‘सिक्सर सिंग’ बनण्यापासून अथवा ऋषभ पंतला ही कामगिरी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लॉर्ड्सवरील पहिल्या डावात दोन षटकार मारून, पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील षटकारांची संख्या ८८ वर नेली आहे. आणि या बाबतीत भारताचा ऑलटाइम बॉस वीरेंद्र सेहवाग (९०) याला मागे टाकण्यासाठी त्याला फक्त ३ षटकारांची आवश्यकता आहे. कदाचित पुढच्या डावातच ही कामगिरी करत ऋषभ पंत नवा रेकॉर्ड सेट करू शकतो.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज
वीरेंद्र सेहवाग – ९१
रोहित शर्मा – ८८
ऋषभ पंत – ८६
एमएस धोनी – ७८
रवींद्र जडेजा – ७२
ऋषभ पंत हा इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. आतापर्यंत ३ कसोटी सामन्यांच्या ५ डावात त्याच्या बॅटमधून १३ षटकार लागले आहेत. जर अशाच प्रकारे त्याच्या बॅटमधून षटकार येत राहिले तर लवकरच पंत केवळ वीरेंद्र सेहवागलाच नव्हे तर अनेक दिग्गजांना मागे टाकेल.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
बेन स्टोक्स – १३३
ब्रेंडन मॅक्युलम – १०७
अॅडम गिलख्रिस्ट – १००
टिम साउदी – ९८
ख्रिस गेल – ९८
जॅक कॅलिस – ९७
वीरेंद्र सेहवाग – ९१
अँजेलो मॅथ्यूज – ९०
षटकारांचे शतक पूर्ण करण्याकडे लक्ष
विरेंद्र सेहवाग हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज आहे. सेहवागने १०४ कसोटी सामन्यांमध्ये ९१ षटकार मारण्याचा विक्रम केला होता. पंत इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतही सेहवागचा हा मोठा विक्रम मोडू शकतो. यासाठी त्याला फक्त ६ षटकारांची आवश्यकता आहे. या वर्षी पंत कसोटीत १०० षटकारही पूर्ण करू शकतो. आतापर्यंत जगातील फक्त ३ खेळाडूंना हा टप्पा गाठता आला आहे. त्यामुळे आता सर्वांचे ऋषभ पंतच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिले आहे.