फोटो सौजन्य - BCCI
केएल राहुलची शतकीय खेळी : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या सामना सुरू आहे, या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट खेळणे हे एक भारतीय खेळाडूंचे स्वप्न असते कारण लॉर्ड्स मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. भारताच्या संघाने या सामन्यात नाणेफेक गमावले आणि भारतीय संघाच्या पदरी निराशा आली. भारताचा अनुभवी फलंदाज के एल राहुल आणि ऋषभ पंत हे दोघे संघासाठी फलंदाजी करत आहेत. या सामन्यात भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत याने अर्धशतक झळकावून नाबाद आहे. तर के एल राहुल ऐतिहासिक शतक झळकावले आहे आणि त्याने लॉर्ड्स मैदानावर हे त्याचे दुसरे शतक आहे.
भारताच्या संघाने ३ विकेट्स गमावल्यानंतर संघाला सावरत कठीण काळामध्ये शतक पूर्ण केले आहे. त्याने भारतासाठी इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेमध्ये दुसरे शतक झळकावले. केएल राहुल याने १७६ चेंडूमध्ये १०० धावा केल्या, यामध्ये त्याने १३ चौकार मारले. लॉर्ड्स मैदानावर एकहून अधिक शतक झळकवणार दुसरा फलंदाज ठरला आहे. राहुलने पहिल्या कसोटी सामन्यातही शतक झळकावले होते . तथापि, आता तिसऱ्या कसोटी सामन्यातही राहुलच्या बॅटमधून शतक झळकले आहे .
💯 runs
1⃣7⃣7⃣ deliveries
1⃣3⃣ foursA knock of patience and composure from @klrahul ✨
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/Rde8gXhF5a
— BCCI (@BCCI) July 12, 2025
तिसऱ्या दिवशी राहुलने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना चकित केले आणि इंग्लिश संघाविरुद्धचा शो चोरला. केएल राहुलने १७७ चेंडूत १०० धावांची शानदार खेळी केली. मात्र, तो ६७.१ षटकांत शोएब बशीरचा बळी ठरला . त्याने १३ चौकारही मारले. पहिल्या कसोटी सामन्यात राहुलने भारतासाठी शतकही केले होते . कसोटी स्वरूपात राहुल भारतासाठी सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे . या डावातही त्याने जवळजवळ प्रत्येक दिशेने शॉट्स खेळले.
Wimbledon 2025 : सेमीफायनलमध्ये पराभवानंतर नोवाक जोकोविचचे मन दुखावलं, निवृत्तीबद्दल मोठे विधान
केएल राहुलच्या व्यतिरिक्त भारतीय संघासाठी रिषभ पंत याने देखील चांगली कामगिरी केली. त्याने संघासाठी 74 धावांची खेळी खेळली यामध्ये त्याने दोन षटकार आणि आठ चौकार मारले. करून नायरने पहिला दिनी 40 धावांची खेळी खेळली होती शुभमन गिल या डावामध्ये फेल ठरला 16 धावा करून तो बाद झाला. १०० धावा केल्यानंतर के एल राहुलने विकेट गमावली तर हा धावबाद झाला. ऋषभ पंत आणि के एल राहुल या दोघांची विकेट गेल्यानंतर आता रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी दोघे फलंदाजी करत आहेत.