फोटो सौजन्य – X (ICC)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या काल तिसरा दिवस पार पडला. यामध्ये भारताचा फलंदाज केएल राहुल यांनी शतक झळकावले. त्याचबरोबर रवींद्र जडेजा याने देखील प्रभावशाली खेळी खेळली. ऋषभ पंत हा देखील चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला. भारताच्या फलंदाजांनी 387 धावांवर इंग्लडच्या संघाला रोखल्यानंतर आता इंग्लडने देखील भारताच्या संघाला 387 धावांवर रोखले आणि या सामन्याचे आथा शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिनी कशी कामगिरी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा तिसरा सामना रोमांचक मोडमध्ये आहे. दोन्ही संघांना खूप प्रयत्न करूनही पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश आले नाही. इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. भारतीय संघही पहिल्या डावात त्याच धावसंख्येवर सर्वबाद झाला होता. शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात टीम इंडिया सर्वबाद झाली. यानंतर, इंग्लंडने आपला दुसरा डाव सुरू केला आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी कोणतेही नुकसान न होता दोन धावा केल्या आहेत.
IND vs ENG : सिनेमा सोडा हे पहा! शुभमन गिल झॅक क्रॉलीसोबत भिडला, Video Viral
एक प्रकारे असे दिसते की दोन्ही संघांचा पहिला डाव संपल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला आहे. कारण आता इंग्लंड जो काही धावसंख्या करेल तो भारताचा टार्गेट असेल आणि त्यात पहिल्या डावातील कोणतीही आघाडी समाविष्ट नसेल. खेळ थांबला तेव्हा जॅक क्रॉली दोन धावांवर नाबाद राहिला आणि बेन डकेट खाते न उघडता नाबाद राहिले. भारताकडून केएल राहुलने १०० धावांची खेळी केली. पंत आणि जडेजाही क्रिकेटचा मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानावर शतके झळकावताना दिसत होते.
That will be stumps on Day 3 at Lord’s!
End of a gripping day of Test cricket 🙌
England 2/0 in the 2nd innings, lead by 2 runs.
Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/wtWmKXl5nD
— BCCI (@BCCI) July 12, 2025
राहुलला शतक पूर्ण करण्याची संधी देण्यासाठी पंतने आपली विकेट गमावली. ख्रिस वोक्सने जडेजाला शतक गाठू दिले नाही. टीम इंडियाने दिवसाची सुरुवात तीन विकेट गमावून १४५ धावांनी केली. पंतने १९ धावा आणि राहुलने ५३ धावा करून डाव पुढे नेला. दोघांनीही सावध फलंदाजी केली आणि इंग्लंडच्या प्रत्येक चालीला अपयशी ठरविले. इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सने पंतच्या बोटाच्या दुखापतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि बॉडीलाइन अटॅक केला. पंतला बाउन्सरचा त्रास झाला. तो ४८ धावांवर असताना स्टोक्सचा चेंडू पंतच्या बोटाला लागला. पंत स्थिर राहिला आणि त्याच षटकात स्टोक्सच्या बाउन्सरवर षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.