फोटो सौजन्य – X (Sony)
शुभमन गिल आणि झॅक क्रॉली बाचाबाची : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेला सामन्यात काल तिसरा दिवस पार पडला. भारताच्या संघाला इंग्लंडने 387 धावांवर रोखले. म्हणजे सामन्यात बरोबरी केली आहे, यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूने दमदार फलंदाजी केली. आता तिसरा डावामध्ये सध्या इंग्लंडचा संघ फलंदाजीला आला आहे. यामध्ये फक्त एक ओव्हर इंग्लंडची काल खेळवण्यात आली आणि या एकच ओव्हरमध्ये इंग्लंडच्या खेळाडू विरुद्ध भारताचा कर्णधार एकमेकांशी भिडताना दिसले.
शुभमन गिल आणि झॅक क्रॉली या दोघांचा हा सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. जसप्रीत बुमराह याने भारताचा संघ ऑलआऊट झाल्यानंतर पहिली ओव्हर टाकण्यासाठी आला होता. पहिला चेंडू टाकला तो क्रॉलीने सोडला. दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि बेन डकेट स्ट्राइक वर आला. तिसरा चेंडू टाकत असताना बुमराह धावून येत असताना क्रॉली थांबला.
यावेळी गोलंदाज अंपायरला तक्रार करत होता यावेळी क्रॉली आणि शुभमन गिल यांच्यामध्ये बाचाबाची झाली. तिसरा चेंडू जसप्रीत बुमराहने पुन्हा सोडला आणि त्यानंतर त्याने क्रॉलीने हा चेंडू सोडला. चौथा चेंडू जसप्रीत बुमराहने क्रॉलीच्या पायाखाली टाकला. खरा ड्रामा पाचव्या चेंडूवर झाला जसप्रीत बुमराह याने पाचवा चेंडू टाकल्यानंतर तो चेंडू क्रॉलीच्या हाताला लागला आणि त्यानंतर तो चवताळू लागला.
Shubman Gill & Co. didn’t come to be played around, 𝙠𝙮𝙪𝙣𝙠𝙞 𝙔𝙚 𝙨𝙚𝙚𝙠𝙝𝙣𝙚 𝙣𝙖𝙝𝙞, 𝙨𝙞𝙠𝙝𝙖𝙣𝙚 𝙖𝙖𝙮𝙚 𝙝𝙖𝙞𝙣!#ENGvIND 👉 3rd TEST, DAY 4 | SUN 13th JULY, 2:30 PM | Streaming on JioHotstar pic.twitter.com/ix13r7vtja
— Star Sports (@StarSportsIndia) July 12, 2025
मार लागल्यामुळे क्रॉली हात झटकू लागला. यावेळी शुभमन गिल क्रॉलीकडे पाहून हसायला लागला आणि टाळ्या वाजवत होता. यावेळी फक्त शुभमन गीलच नाही तर ध्रुव जुरेल, जडेजा, यशस्वी जयस्वाल हे सर्व टाळ्या वाजवत होते. हे क्रॉलीला अजिबात आवडले नाही. यावेळी तो शुभमनला काही तरी म्हणाला त्यानंतर गिल लगेचच क्रोलीच्या दिशेने धावला. यावेळी दोघांमध्ये हातवारे आणि बाचाबाची झाली. मध्यस्थी करण्यासाठी अंपायरला आणि केएल राहून आले होते.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यांमध्ये सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची फलंदाजी केली आहे. सर्व क्रिकेट चाहत्याच्या नजरा या भारतीय संघाच्या चौथ्या दिनाच्या कामगिरीवर असणार आहेत. भारतीय संघाने चौथ्या दिनी इंग्लडचे सर्व फलंदाज बाद केले तर संघ या सामन्यात विजय मिळवु शकतो.