
'There is life beyond cricket, the right time has come...' Crisis man KL Rahul makes a big revelation about retirement; creates a stir in the cricket world.
KL Rahul commented on his retirement : भारताचा संकटमोचक खेळाडू म्हणून ओळखला जाणारा अनुभवी फलंदाज केएल राहुलने निवृत्तीबद्दल मोठे विधान केले आहे. केएल राहुलने हे मान्य केले आहे की, त्याच्याकडून निवृत्तीचा करण्यात आला आहे. परंतु, तो अजून देखील “काही वेळ दूर आहे” असे त्याला वाटत असून योग्य वेळ आल्यावर तो निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. केएल राहुल आता रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसेल. तो मोहाली येथे पंजाबविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात कर्नाटककडून खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाचे समीकरण बदलणार! पाकिस्तान बाहेर अन् बांगलादेश आत? ICC चा मोठा डाव
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनसोबत त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना, ३३ वर्षीय केएल राहुलने सांगितले की, निवृत्ती हा त्याच्यासाठी कठीण निर्णय असणार नाही. नसेल कारण क्रिकेटच्या पलीकडे देखील एक आयुष्य आहे. राहुल म्हणाला की, “मी त्याबद्दल विचार केला असून मला वाटत नाही की हा खूप कठीण निर्णय असेल. जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल, तर वेळ येईपर्यंत तो पुढे ढकलण्यात काही अर्थ उरत नाही. त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागणार आहे.”
भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू असणारा केएल राहुल पुढे म्हणतो आय, तो स्वतःला सुपरस्टार किंवा अत्यंत महत्वाचा व्यक्ती वैगरे मानत नाही, ज्यामुळे भविष्यात निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे होणार. के एल राहुल म्हणाला की, “शांतपणे खेळ सोडा. तुमच्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्या. तुमचे कुटुंब आहे, म्हणून जे तुम्हाला आनंद देते ते करा. मी स्वतःला सांगतो की मी जास्त महत्वाचे नाही.”
केएल राहुल पुढे असे देखील म्हणाला की, “आपल्या देशात क्रिकेट चालू राहील, जगभर चालू राहणार आहे. आयुष्यात आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. माझी नेहमीच ही मानसिकता होती, परंतु वडील होण्याने माझा जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात पूर्णपणे बदल झाला आहे.”
केएल राहुलने आतापर्यंत ६७ कसोटी सामन्यांमध्ये ३५.८ च्या सरासरीने ४,०५३ धावा फटकावल्या आहेत. तर ९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५०.९ च्या सरासरीने ३,३६० धावा केल्या आहेत. सतेच त्याने ७२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना ३७.७५ च्या सरासरीने आणि १३९ च्या स्ट्राईक रेटने २,२६५ धावा केल्या आहेत.