फोटो सौजन्य - X
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या मालिकेचा शेवटचा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिल्या डावांमध्ये 204 धावा केल्या होत्या तेव्हा दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या. सध्या आता शेवटच्या इनिंगसाठी इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे. इंग्लंड संघाच्या फलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर इंग्लंडच्या संघाने एक विकेट गमावून 50 धावा केल्या आहेत. तिसरा दिनाच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाकडे 324 धावांची आघाडी आहे. भारताच्या संघासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे कारण भारताच्या संघाने या सामन्यात विजय मिळवल्यास मालिका बरोबरीत संपेल.
जर हा सामने ड्रॉ झाला तर इंग्लंडचं संघ मालिका जिंकेल. त्यानंतर सध्या सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने एक व्हिडिओ कालच्या सामन्याचा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आणखी एकदा इंग्लंड खेळाडूचा ढोंगीपणा पाहायला मिळाला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आत्ता सध्या शेवटची इनिंग सुरू आहे. इंग्लंडचा संघ सध्या फलंदाजी करत आहे आणि कालच्या सामन्यांमध्ये शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना जॅक क्रोली चा पुन्हा एकदा ढोंगीपणा पाहायला मिळाला.
IND vs ENG: वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, कसोटी क्रिकेटमध्ये One Day ची चाहत्यांना मजा; 396 वर डाव संपला
चौदावी ओव्हर मोहम्मद सिराज टाकत असताना त्याचा पाचवा पाचव्या चेंडूवर जॅक क्रॉली वेळ घालवायला सुरुवात झाली. रनर अपवर धावत असताना त्याने सिराजला पुन्हा एकदा मागे पाठवले. त्यानंतर जेव्हा त्याच चेंडूवर सिराज ने बॉल टाकला तेव्हा जॅक क्रॉलीला सिराज में स्टंप आऊट केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. भारतीय संघाच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर, आणि आकाशदीप यांनी अर्धशतके झळकावली त्याचबरोबर यशस्वी जयस्वाल यांनी शतक झळकावले. भारताच्या संघाने कालच्या सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी केली.
Crawley didn’t want another over; Siraj made sure of it 🤷♂️ #SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings | @mdsirajofficial pic.twitter.com/uWi1v0CNYA — Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 2, 2025
इंग्लंडच्या संघासाठी सरप्राईज पॅक हा आकाशदीप राहिला त्याने 65 धावांची खेळी खेळली आणि सर्वांना चकित केले. त्याच्या या खेळीने सर्वच चकित झाले आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले अर्धशतक झळकावणे. सुरू असलेल्या सामन्यांमध्ये दुसरा दिने त्याला नाईट वॉचमन म्हणून मैदानात पाठवले होते पण त्याने तिसऱ्या दिनी सुरुवातीपासूनच इंग्लंडवर धबधबा दाखवला. आणि इंग्लंडच्या संघाचा घाम गाळला त्यांनी चौकार ठोकून त्याचबरोबर मोठे शॉट मारून इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच धुतलं.