फोटो सौजन्य – X
बेन डकेट आणि साई सुदर्शन यांच्यात वाद : भारताचा संघ सध्या इंग्लडविरुद्ध मालिका खेळत आहे, या मालिकेचा शेवटचा सामना सध्या सुरु आहे. काल या सामन्याचा दुसरा दिवस हा गोलंदाजांच्या नावावर राहिला. भारताच्या संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे, सध्या इंग्लडच्या संघाकडे या मालिकेची आघाडी आहे त्यामुळे मालिकेमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. या सामन्यामध्ये अनेक खेळाडूंमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. प्रसिद्ध कृष्णा आणि जो रुट यांच्यामध्ये देखील टशनबाजी पाहायला मिळाली. त्याचबरोबर केएल राहुल आणि अंपायर धर्मसेना यांच्यामध्ये देखील संभाषण झाले होते.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी ओव्हल येथे खेळली जात आहे. ज्यामध्ये २ दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे, सध्या टीम इंडिया थोडी चांगली स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये बरेच वादविवाद दिसून आले, प्रथम जो रूट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात जोरदार वाद झाला आणि नंतर बेन डकेट आणि साई सुदर्शन यांच्यात बाचाबाची झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावातही साई सुदर्शन काही खास कामगिरी करू शकला नाही. दुसऱ्या डावात साई फक्त ११ धावा करून बाद झाला. खरंतर, दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राच्या १८ व्या षटकात टीम इंडियाला साई सुदर्शनच्या रूपात दुसरा धक्का बसला. गस अॅटकिन्सनने सुदर्शनला एलबीडब्ल्यू आऊट केले होते.
यादरम्यान साईने डीआरएसचा वापर केला पण तिसऱ्या पंचांनीही भारतीय फलंदाजाला बाद घोषित केले. साई पॅव्हेलियनमध्ये परतत असताना बेन डकेटने त्याला काहीतरी बोलून चिडवले, त्यानंतर साईने बेन डकेटला उत्तर दिले आणि नंतर पॅव्हेलियनकडे निघून गेला.
Gus Atkinson traps Sai Sudharsan LBW! ☝️
🇮🇳 7️⃣0️⃣-2️⃣ pic.twitter.com/pKU0sMabE6
— England Cricket (@englandcricket) August 1, 2025
दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपला. टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ४-४ विकेट घेतल्या. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जॅक क्रॉलीने ६४ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस टीम इंडियाने दुसऱ्या डावात २ विकेट गमावल्यानंतर ७५ धावा केल्या होत्या. यशस्वी जयस्वालने शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावले. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी ५२ धावांची आघाडी मिळाली.