IND vs ENG: Name 10 names that match 'these' 22 bowlers! Former England batsman challenges the cricket world..
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला जात आहे. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद ३५८ धावा केल्या. तर त्याच्या प्रतिउत्तरात इंग्लंडने जो रूटच्या दीड शतक आणि बेन स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर सर्वबाद ६६९ धावा केल्या असून ३११ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युउत्तरात भारताने २ विकेट्स गमावून १७४ धावा केल्या आहेत. यामध्ये केएल राहुल ८७ तर कर्णधार शुभमन गिल ७८ धावांवर नाबाद आहेत. भारत अद्याप १३७ धावांनी पिछाडीवर आहे. या दरम्यान इंग्लंडच्या जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने रिकी पॉन्टिंग, राहुल द्रविड आणि जॅक कॅलिस यांना मागे टाकले आहे. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी फलंदाज पीटरसनने मोठा दावा केला आहे. त्याच्या मते, आधीच्यापेक्षा आता फलंदाजी करणे अधिक सोपे झाले आहे.
इंग्लंडचा त्याच्या काळातील महान फलंदाज केविन पीटरसनने असा दावा करून एक नवीन वाद सुरू केला आहे, २०-२५ वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्याच्या युगात फलंदाजी करणे “खूप सोपे झाले आहे. कारण कसोटी खेळणाऱ्या देशांच्या गोलंदाजीची पातळी घसरली आहे असे बेडक मत त्याने वर्तविले. इंग्लंडचा फलंदाज जो रूटने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्यानंतर सोशल मीडियावर पीटरसनची ही टिप्पणी आली.
पीटरसनने शनिवारी एक्स वर लिहिले, माझ्यावर ओरडू नका, पण आजकाल फलंदाजी करणे २०-२५ वर्षांपूर्वीच्या तुलनेत खूप सोपे झाले आहे. कदाचित तेव्हा फलंदाजी करणे आजच्यापेक्षा दुप्पट कठीण होते. २००५ ते २०१३ दरम्यान पीटरसनने इंग्लंडसाठी १०४ कसोटी, १३६ एकदिवसीय आणि ३७ टी-२० सामने खेळले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४७.२८ च्या सरासरीने ८,१८१ धावा केल्या ज्यामध्ये २३ शतके आणि ३५ अर्धशतके आहेत. पीटरसनने त्याच्या काळातील अनेक गोलंदाजांची नावे घेतली आणि त्याच्या अनुयायांना त्याच्याशी तुलना करता येईल अशा १० समकालीन गोलंदाजांची नावे देण्याचे आव्हान दिले.
हेही वाचा : AUS vs WI : ग्रीन-इंग्लिशच्या बळावर ऑस्ट्रेलियाने मारला विजयाचा चौकार! WI ला लाज वाचवण्याची शेवटची संधी
त्याने लिहिले, वकार, शोएब, अक्रम, मुश्ताक, कुंबळे, श्रीनाथ, हरभजन, डोनाल्ड, पोलॉक, क्लुजनर, गॉफ, मॅकग्रा, ली, वॉर्न, गिलेस्पी, बाँड, व्हेटोरी, केर्स, वास, मुरली, कर्टली, कोर्टनी आणि ही यादी खूप मोठी असू शकते. मी वर २२ गोलंदाजांची नावे सांगितली आहेत. कृपया मला सध्याच्या काळातील १० गोलंदाजांची नावे सांगा जी वर दिलेल्या नावांशी जुळतील.