IND VS ENG : WTC points table मध्ये भारताला मोठा झटका! इंग्लंड संघाची दुसऱ्या स्थानावर मुसंडी
इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. त्याचबरोबर या विजयासह इंग्लंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत देखील मुसंडी मारली आहे.
WTC points table : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर २२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने अँडरसन-तेंडुलकर मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. त्याचबरोबर या विजयासह इंग्लंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत देखील मुसंडी मारली आहे. इंग्लंड आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडने भारताचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५-२७ च्या गुणतालिकेत मोठी उडी घेतली आहे. या विजयासह, इंग्लंडने तीनपैकी दोन सामने आपल्या खिशात घातले आहेत. या विजयासह इंग्लंड संघ २४ गुण घेऊन दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. इंग्लंड आता केवळ ऑस्ट्रेलियाच्या मागे आहे, जो आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकून अव्वल स्थानावर कायम आहे. त्याच वेळी, भारतीय संघ या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३८७ धावा केल्या, ज्यामध्ये जो रूटने शानदार शतक केले आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स काढल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने देखील ३८७ धावा केल्या होत्या. यावेळी केएल राहुलने शानदार शतक झळकावले होते, तर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकांपेक्षा जास्त धावा करून भारताला मोठा हातभार लावाला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने तीन विकेट्स मिळवल्या.
तिसऱ्या आणि चौथ्या डावात देखील वेगाने सामना पुढे जात राहिला. लॉर्ड्सची खेळपट्टी देखील अधिकी कठीण झाली. नवीन चेंडूविरुद्ध खेळणे फलंदाजाना कठीण झाले होते. भारताने याचा फायदा घेत इंग्लंडला फक्त १९२ धावांवर गारद केले. भारत १९३ धावांचे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले. परंतु पाचव्या दिवसाच्या सुरुवातीने सामन्याने पूर्णपणे वेगळे वळण घेतले. भारताची पाचव्या दिवसाची सुरुवात ५८/४ ने केली आणि पहिल्या तासातच बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरने भारताची मधली फळीला खिंडार पाडले.
केएल राहुल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी सारखे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. बुमराह आणि सिराजसह रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडच्या गोलदाजांचा प्रतिकार करत आशा निर्माण केल्या होत्या, परंतु धावांचा वेग कमी होता आणि संघाला नशिबाची साथ जास्त काळ टिकली नाही. अखेर, सिराजच्या कमकुवत बचावामुळे चेंडू यष्टीवर जाऊन आदळला आणि इंग्लंडने भारतावर २२ धावांनी विजय मिळवला.
Web Title: Ind vs eng big blow to india in wtc points table england slips to second place