भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळात आहे. या मालिकेत भारताने १ सामना जिंकला हे तर २ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतीय संघ काल झालेल्या लॉर्ड्सवर इंग्लंडकडून २२ धावांनी पराभूत झाला आहे. तर दुसरीकडे, महिला संघाने टी-२० मालिका ३-२ ने आपल्या खिशात घातली आहे. महिला संघ आता एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. या दरम्यान, भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाने लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली आहे.
PHOTO: Indian men's and women's teams meet King Charles III, players look happy after meeting.
किंग चार्ल्स तृतीय यांच्या भेटीदरम्यान, दोन्ही संघांचे प्रशिक्षक, कर्मचारी आणि बीसीसीआयचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि भारतीय कर्णधार शुभमन गिल यांनी किंग चार्ल्स यांची भेट घेतली. (फोटो-पीटीआय/सोशल मीडिया)
लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून भारताला २२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली. इंग्लंड संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. (फोटो-पीटीआय/सोशल मीडिया)
किंग चार्ल्स तृतीय यांना भेटल्यानंतर भारतीय युवा कर्णधार शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "किंग चार्ल्स तृतीय यांना भेटून खूप आनंद झाला आणि त्यांनी आम्हाला फोन करून उदारता दाखवली.आम्ही छान चर्चा केली. किंग चार्ल्स तृतीय यांनी शेवटच्या कसोटी सामन्यात आमचा शेवटचा फलंदाज नेमका कसा बाद झाला हे सांगितले."(फोटो-पीटीआय/सोशल मीडिया)
शुभमन गिल पुढे म्हणाला कि, "ते आमच्यासाठी खूपच दुर्दैवी होते, चेंडू स्टंपवर आदळला. आम्ही त्याला सांगितले की हा आमच्यासाठी एक दुर्दैवी असा सामना होता आणि तो कोणत्याही दिशेने झुकू शकला असता. आशा आहे की पुढील दोन सामन्यांमध्ये आमचे नशीब चांगले असणार आहे." (फोटो-पीटीआय/सोशल मीडिया)
लॉर्ड्स कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाबद्दल शुभमन गिल बोलला कि, "दोन्ही संघांनी ज्या पद्धतीने खेळ दाखवला. त्यांनी खूप उत्साह दाखवला. आम्ही खूप अभिमानाने खेळलो आणि आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले. शेवटी, जेव्हा तुम्ही पाच दिवस खेळला जाणारा कसोटी सामना जिंकता आणि २० धावांनी हरता तेव्हा विजेत्या संघाला खूप छान वाटते."(फोटो-पीटीआय/सोशल मीडिया)
भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकली. मालिका जिंकल्यानंतर, भारतीय महिला संघ बुधवारपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका खेळायला सुरवात करणार आहे. भारतीय महिला संघ यजमान संघाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.(फोटो-पीटीआय/सोशल मीडिया)