टिम इंग्लंड(फोटो-सोशल मिडिया)
IND VS ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने खेळून झाले आहेत. या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये इंग्लंड संघाने २-१ घेतली आहे. नुकत्याच झालेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर २२ धावांनी विजय मिळवलाया आहे. आता या मालिकेतील पुढील सामना २३ जुलैपासून खेळवला जाणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी इंग्लंडला झटका बसला आहे. त्यांचा एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.याबाबत आतापण जाणून घेऊया.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीसाठी दुखापतग्रस्त ऑफ-स्पिनर शोएब बशीरच्या जागी ३५ वर्षीय अष्टपैलू लियाम डॉसनला संघात सामील करून घेतले आहे. बशीर दुखापग्रस्त झाल्यामुळे संघालाय हा बदल करावा लागला आहे. बशीर या मालिकेतून बाहेर पडला आहे. बशीरच्या डाव्या बोटाला गंभीर फ्रॅक्चर आहे, ज्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. लॉर्ड्स कसोटीदरम्यान रवींद्र जडेजाचा वेगवान शॉट त्याच्या हाताला लागल्याने त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. तथापि, दुखापतग्रस्त असून देखील तो संपूर्ण सामना खेळला आणि त्याने शेवटची एक विकेट घेऊन संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा : इंग्लंडसाठी खुशखबर! जेम्स अँडरसन मँचेस्टरमध्ये मैदानात उतरणार..
लियाम डॉसनचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही एक मोठी संधी असणार आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू असलेल्या लियाम डॉसनने आतापर्यंत इंग्लंडसाठी ३ कसोटी, ६ एकदिवसीय आणि १४ टी-२० सामने खेळलेले आहेत. या दरम्यान, त्याने कसोटीत ७ बळीसह ८४ धावा केल्या आहेत. तथापि, डॉसनने २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडसाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून तो इंग्लंडच्या कसोटी संघाबाहेर होता. पण आता वर्षांनंतर त्याला पुनरागमन करण्याची संधी चालून आली आहे आणि तो चौथ्या कसोटीत खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : PHOTOS : भारतीय पुरुष आणि महिला संघाने घेतली किंग चार्ल्स तृतीय यांची भेट, भेटींनंतर खेळाडू दिसले आंनदात..
टीम इंडियापूर्वी इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. डावखुरा फिरकी गोलंदाज लियाम डॉसनचा या टी-२० मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता. परंतु, त्याला या मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकली नाही. जो त्याचा ३ वर्षांनंतरचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना ठरला.