फोटो सौजन्य - England and Wales Cricket Board
भारत अ विरुद्ध इंग्लंड : भारताचा अ आजपासून इंग्लंड विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आजपासून या कसोटी मालिकेचा पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताचा संघ हा अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. आजच्या सामनात इंग्लंड लायन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा मूळ संघ हा इंग्लंड दौऱ्यावर 20 जूनपासून असणार आहे.
त्याआधी मूळ संघामध्ये असलेले काही खेळाडू हे या संघामध्ये सामील झाल्या आहेत त्यामुळे त्यांनाही सराव सामने म्हणून नक्कीच त्याचा फायदा होईल. भारताचा अ संघाचा सामना इंग्लंड विरुद्ध सुरू झाला आहे या दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय आहे या संदर्भात जाणून घ्या.
भारताच्या संघामध्ये अभिमन्यू ईश्वरन हा भारताचा कर्णधार असणार आहे त्याचबरोबर यशस्वी जयस्वाल हा सलामीवीर फलंदाज म्हणून फलंदाजी करणार आहे त्याचबरोबर करून नायरला देखील तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. सरफराज खान त्याचबरोबर विकेट कीपर म्हणून ध्रुव जुरेल याची निवड करण्यात आली आहे. ऑल राऊंडरमध्ये नितेश कुमार रेड्डी आणि शार्दुल ठाकूर या दोघांना संधी देण्यात आली आहे. या दोघांना भारताच्या मूळ संघामध्ये देखील स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर हर्ष दुबे याला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये अंशुल कंबोज हर्षित राणा आणि मुकेश कुमार या तीन गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.
या मालिकेमध्ये भारताविरुद्ध इंग्लंडचे दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत पहिला सामना 30 जून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. तर दुसरा सामना हा 6 जून पासून खेळवला जाणार आहे. भारताचे खेळाडू आयोजित केलेल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आले आहेत त्यांच्यासाठी प्रॅक्टिस सामने म्हणून या सामन्यांची मदत नक्कीच होईल.
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, करून नायर, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), नितेश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, हर्ष दुबे, अंशुल कंबोज हर्षित राणा, मुकेश कुमार
थॉमस हेन्स, बेन मॅककिनी, एमिलियो गे, जेम्स रीव (कर्णधार/विकेटकिपर), डॅन मौसली, रेहान अहमद, एडी जॅक, जोश हल, अजितसिंग दळे, जमान अख्तर, मॅक्स होल्डन