IND Vs ENG: Washington's 'beautiful' four! England's innings crumble; India set a target of 193 runs for victory..
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्सवर खेळाला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा सिद्ध केला आणि इंग्लंडला दुसऱ्या डावात १९२ धावांवर रोखले. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा कराव्या लागणार आहेत. दुसऱ्या डावात इंग्लडच्या कोणत्याच फलंदाजाला मैदानावर टिकाव धरता आला नाही. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
भारतीय संघ या मलिकते आतापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रकारात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाज चांगली फ्लडनजी करता आहेत तर गोलंदाज देखील विकेट काढताना दिसत आहेत. लॉर्ड्स येथे खेळवण्यात येत असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ धावा केल्या. यात जो रूटने शतक झळकावले. तर भारताकडून बुमराहने ५ विकेट्स घेऊन इंग्लंडला रोखण्यात मोठी भूमिका बजावली. घेतल्या. इंग्लंडच्या ३८७ धावांच्या प्रत्युउत्तरात टीम इंडियाने केएल राहुलने शानदार शतकाच्या जोरावर ३८७ धावा केल्या.
इंग्लंडने तिसऱ्या दिवशीच्या अखेरीस बिनबाद २ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा इंग्लडची सुरवात चांगली झाली नाही. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट १२ धावांवर आउट झाला. त्यांनतर इंग्लंडच्या विकेट जात राहिल्या. ऑली पोपला ४, झॅक क्रॉली २२, हॅरी ब्रुक २३, जो रूट ४०, हॅरी बेन स्टोक्स ३३, जेमी स्मिथ ८, ख्रिस वोक्स ८, कार्स १, शोएब बशीर २ धावा करून बाद झाले, तर जोफ्रा आर्चर ५ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २, नितीश कुमार रेड्डी आणि आकाश यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : IND Vs ENG : मोहम्मद सिराजची लॉर्ड्सवर मोठा कारनामा! भारताच्या ‘या’ दिग्गज गोलंदाजाला टाकले मागे..
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळाला जात आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने इंग्लंडला सुरुवातीचे दोन मोठे धक्के दिले. या दोन विकेट्स घेण्यासोबत सिराजने एक मोठी कामगिरी केली आहे. सिराजने सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत माजी भारतीय फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्ना यांना पिछाडीवर टाकले आहे. मोहम्मद सिराजने आतापर्यंत सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये ८१ बळी मिळवले आहेत. तर इरापल्ली प्रसन्ना यांनी सेना देशांमध्ये ७८ विकेट्स घेण्याची किमया साधली होती. सिराज आता सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा ९ वा भारतीय गोलंदाज बनला आहे.