मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Siraj’s big performance at Lord’s : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळाला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने इंग्लंडला सुरुवातीचे दोन मोठे धक्के दिले. या दोन विकेट्स घेण्यासोबत सिराजने एक मोठी कामगिरी केली आहे. सिराजने सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत माजी भारतीय फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्ना यांना पिछाडीवर टाकले आहे.
हेही वाचा : Aus vs WI : क्रिकेट विश्वात खलबली! अँडरसन फिलिपने हेडचा घेतला चमत्कारिक झेल; पहा Video
मोहम्मद सिराजने आतापर्यंत सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये ८१ बळी मिळवले आहेत. तर इरापल्ली प्रसन्ना यांनी सेना देशांमध्ये ७८ विकेट्स घेण्याची किमया साधली होती. सिराज आता सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा ९ वा भारतीय गोलंदाज बनला आहे. या यादीत जसप्रीत बुमराह १५५ विकेट्ससह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. बुमराह हा सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला आशियाई खेळाडू देखील ठरला आहे. ज्याच्या नावावर आता १५० पेक्षा जास्त विकेट्स जमा आहेत.
सद्या जोरदार फॉर्ममध्ये असणारा भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने प्रसन्ना यांना मागे सोडले आहे. आता सिराजचे लक्ष जवागल श्रीनाथच्या विक्रमावर असणार आहे. जवागल श्रीनाथच्या पुढे जाण्यासाठी सिराजला आणखी ९ विकेट्सची आवश्यकता आहे. श्रीनाथने सेना देशांमध्ये ८९ विकेट्स घेतल्या असून दुसरीकडे, जर सिराजने या मालिकेत १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली तर तो बिशन सिंग बेदीचा विक्रम देखील मोडू शकतो.
हेही वाचा : IND Vs ENG : लंच ब्रेकपर्यंत इंग्लंड बॅक फुटवर! दोन्ही सलामीवीर माघारी, भारतीय गोलंदाजांनी उडवली दाणादाण…
लॉर्ड्सवर सिराजने दोन विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि ऑली पोप या दोघांना देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. बेन डकेटने सुरुवात चांगली केलीय साली तरी धावा जलद करण्याच्या प्रयत्नात त्याने चुकीचा फटका मारला आणि सहाव्या षटकातच डकेट माघारी परतला. डकेटने १२ धावा काढल्या. त्यानंतर सिराजने ऑली पोपला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने ४ धावा काढल्या.