जॅक क्रॉली आणि जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळाला जात आहे. तिसरा कसोटी सामना रंगतदार वळणावर आला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगली टक्कर बघायला मिळत आहे. भारतीय गोलंदाजांनी आपलं दबदबा कायम ठेवला असून इंग्लंडचे फलंदाज संघर्ष करताना दिसून येत आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याआधी इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट वेळ वाया घालवताना दिसून आले. तेव्हा भारतीय संघाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. शुभमन गिल आणि मोहम्म्द सिराज हे आक्रमक दिसून आले. ज्यामुळे दोन्ही संघांमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाल्याचे सर्वांनी पाहिले. चौथ्या दिवसाची सुरवात झाली तेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा सलामीवीर क्रॉलीला असा काही धडा शिकवला कि तो आता आयुष्यभर आठवण ठेवेल.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, क्रॉली आणि डकेट या इंग्लंडच्या सलामीवीरांनी क्रीजवर वेळ वाया घालवत असल्याचे दिसून आले. क्रॉलीने आपल्या बोटाला दुखापत झालायचे निमित्त करून वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला.जेणेकरून त्याला जास्त वेळ फलंदाजी करावी लागणार नाही आणि भारतीय गोलंदाज अधिकची ओव्हर टाकणार नाहीत. या दरम्यान, दोन्ही संघांचे खेळाडू आमनेसामने आले आणि त्यांच्यात वाद देखील निर्माण झाला. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराहने क्रॉलीला चांगलीच अद्दल घडवून त्याच्या शैलीत उत्तर दिले. चौथ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराहचा चेंडू क्रॉलीच्या हातावर आदळला आणि त्याची बॅट बाहेर फेकल्या गेली. आता हि अद्दल क्रॉली आयुष्यभर आठवण राहील अशी होती.
हेही वाचा : Aus vs WI : क्रिकेट विश्वात खलबली! अँडरसन फिलिपने हेडचा घेतला चमत्कारिक झेल; पहा Video
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराहचा एक चेंडू थेट क्रॉलीच्या हाताला लागला, ज्यामुळे त्याला खूप वेदना झालेल्या दिसून आल्या. एवढेच नाही तर क्रॉलीला वेदनेने ओरडताना दिसून आला. त्यासोबत त्याने आपल्या हातची बॅट देखील फेकली. पण बुमराह यावरच थांबला नाही. काही वेळाने त्याने क्रॉलीच्या हातावर दुसरा चेंडू देखील मारल्याचे दिसले. यामुळे क्रॉलीचा आत्मविश्वास पूर्णपणे गळून पडल्याचे दिसुन आले. या गोलंदाजीनंतर क्रॉली जास्त वेळ मैदानावर तग धरू शकला नाही. त्याला मोहम्मद सिराजने माघारी पाठवले. त्याने २२ धावा केल्या.
हेही वाचा : IND Vs ENG : लंच ब्रेकपर्यंत इंग्लंड बॅक फुटवर! दोन्ही सलामीवीर माघारी, भारतीय गोलंदाजांनी उडवली दाणादाण…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळाला जात आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने इंग्लंडला सुरुवातीचे दोन मोठे धक्के दिले. या दोन विकेट्स घेण्यासोबत सिराजने एक मोठी कामगिरी केली आहे. सिराजने सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत माजी भारतीय फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्ना यांना पिछाडीवर टाकले आहे. मोहम्मद सिराजने आतापर्यंत सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये ८१ बळी मिळवले आहेत. तर इरापल्ली प्रसन्ना यांनी सेना देशांमध्ये ७८ विकेट्स घेण्याची किमया साधली होती. सिराज आता सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा ९ वा भारतीय गोलंदाज बनला आहे.