फोटो सौजन्य - Facebook
भारताचा अ संघ : भारताचा अ संघ 30 मे पासून इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. यामध्ये टीम इंडिया तीन सामने खेळणार आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे कर्णधार पद कोणाच्या हाती द्यायचे यावर मोठे प्रश्नचिन्ह होते. बीसीसीआयने आता टीम ए ची घोषणा केली आहे यामध्ये अभिमन्यू ईश्वरन याच्या हाती संघाची कमान देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही कमालीच्या खेळाडूंना या संघामध्ये सामील करण्यात आले आहे. तर संघाचे उपकर्णधारपद हे ध्रुव जुरेलकडे देण्यात आले आहे.
अभिमन्यू ईश्वरन हा संघाचा कर्णधार असणार आहे त्याचबरोबर या संघामध्ये यशस्वी जयस्वाल, करून नायर यांना देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे. मधल्या फळीमध्ये ईशान किशन त्याचबरोबर नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटीयन, मानव सुतार या नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे. 2025 च्या या सीझनमध्ये खलील अहमद, अंशुल कंबोज, हर्षित राणा यांनी कमालीची गोलंदाजी केली होती. मुकेश कुमार, आकाशदीप, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, सरफराज खान, चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे परंतु अजून तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
India A’s squad for tour of England announced.
All The Details 🔽
— BCCI (@BCCI) May 16, 2025
शार्दुल ठाकूरने आयपीएलच्या त्याच्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती पण त्यानंतर तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही पण त्याला यावेळी संघामध्ये सामील करण्यात आले आहे. शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरात टायटन्सच्या संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. हे दोघेही या संघामध्ये दुसऱ्या सामन्यानंतर सामील होणार आहेत असे बीसीसीआयने सांगितले आहे. आयपीएलचा फायनलचा सामना हा 3 जून रोजी खेळवला जाणार आहे त्यानंतर हे दोघेही इंग्लंड दौऱ्यावर सामील होणार असे सांगण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये शरद पवारांचा मोलाचं वाटा! वानखेडेवर देवेंद्र फडणवीस यांनी केला कौतुकाचा वर्षाव
अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार) (विकेटकिपर), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (विकेटकिपर), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलिल अहमद, रूतुराज गायकवाज, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे