फोटो सौजन्य - BCCI Women
इंग्लंडविरुद्ध भारताचा महिला संघ : भारतीय महिला संघ इंग्लंड विरुद्ध t20 मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे यावेळी भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. भारताच्या संघाने एकदिवसीय मालिकेसाठी आणि t20 मालिकेसाठी अशा दोन्ही सिरीजसाठी खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यामध्ये दोन्ही संघ हे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहेत. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर असणार आहे तर स्मृती मानधना हे संघाची उपकर्णधार असणार आहे.
भारतीय संघामध्ये स्मृती मानधना, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिक्स यांसारख्या अनुभवी खेळाडूंना संघामध्ये सामील करण्यात आले आहे. श्रीलंकेमध्ये झालेल्या ट्राय सिरीजमध्ये स्मृती मानधनाने फायनलच्या सामन्यात शतक झळकावले होते तर जेमिमा रॉड्रिक्स हिने देखील मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 123 धावांची दमदार खेळी खेळली होती. भारताची अष्टपैलू स्नेह राणा हिने संघासाठी ट्राय सिरीजमध्ये कमालची गोलंदाजी केली होती. फायनलच्या सामन्यात तिने चार विकेट्स नावावर केले होते. त्याचबरोबर भारताच्या संघाला विजय मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा होता.
बीसीसीआयने सुनील गावस्कर यांना दिला विशेष सन्मान, कसोटी इतिहासात 10,000 धावा करणारे पहिले फलंदाज
संघामध्ये अनेक नव्या खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. यामध्ये सुची उपाध्याय, अमनज्योत कौर, प्रतिका रावल या नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे. टी20 संघांबद्दल बोलायचं झाले तर प्रतिका रावल हिच्या जागेवर शेफाली वर्मा हिला संघामध्ये स्थान मिळाले आहे. एकदिवसीय मालिकेच्या संघामध्ये आणि t20 मालिकेचे संघामध्ये जास्त बदल करण्यात आलेले नाही. फक्त शेफाली वर्माचे स्थान हे एकदिवसीय मालिकेमध्ये प्रतिका रावल हिला देण्यात आले आहे.
🚨NEWS – Team India (Senior Women) squads for the upcoming England tour announced 🚨
A look at the squads for T20Is and ODIs 👇#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/lrUMzF09f8
— BCCI Women (@BCCIWomen) May 15, 2025
हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, सूची उपाध्याय, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे
हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, प्रतिका रावल, जेमिमा रॉड्रिक्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, तेजल सबनिस, हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, सूची उपाध्याय, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे