IND vs ENG: Jasprit Bumrah makes a strong comeback! Creates history at Lord's, becomes the first Indian bowler to do so abroad
Jasprit Bumrah creates history at Lord’s : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. लीड्स कसोटीनंतर या सामन्यात जसप्रीत बुमराहने जोरदार पुनरागमन केले आहे. जसप्रीत बुमराहने लॉर्ड्स कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेऊन इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले आणि इंग्लंडला ३८७ धावांवर रोखण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या कामगिरीसह बुमराहने लॉर्ड्स येथे पाच विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. तोपरदेशात एका डावात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
जसप्रीत बुमराहने घराबाहेर १३ वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने कपिल देवला पिछाडीवर टाकून ही खास कामगिरी केली आहे. कपिल देवने घराबाहेर १२ वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याची किमया साधली होती. आता घराबाहेर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा हा विक्रम बुमराहच्या नावावर जमा झाला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : लॉर्ड्सवर इंग्लंड ३८७ धावांवर गारद; जो रूटचे शतक, तर बुमराहच्या ५ विकेट्स
लॉर्ड्सच्या मैदानावर आजच्या सामन्यातील ५ विकेट्स बुमराच्या पहिल्या पाच विकेट्स आहेत. बुमराहने कपिल देवचा विक्रम मोडण्यासोबतच त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमशी देखील बरोबरी साधली आहे. वासिम अक्रम हा सेना देशांमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेणारा आशियाई खेळाडू होता. त्याने एका डावात ११ वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. बुमराहनेही या विक्रमाशी आता बरोबरी केली आहे.
गुरुवारी (१० जुलै) तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या सत्रामध्ये टेस्ट क्रिकेटमधील जगातील नंबर १ कसोटी फलंदाज हॅरी ब्रूकला आपली शिकार बनवून बुमराहने आपले विकेटचे खाते उघडले.हॅरी ब्रूकला बुमराहने २० चेंडूत ११ धावा देऊन क्लीन बोल्ड केले. त्यानंतर, खेळाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बुमराहने तीन विकेट्स घेऊन कहर केला. प्रथम त्याने बेन स्टोक्स (४४) चा बचाव मोडून काढत त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर जो रूट (१०४) आणि ख्रिस वोक्स (०) यांना सलग दोन चेंडूंवर बुमराहने माघारी पाठवले.
FIFER for Jasprit Bumrah 🫡
His maiden five-wicket haul at Lord’s in Test cricket 👏👏
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#TeamIndia | #ENGvIND | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/AfyXq9r6kD
— BCCI (@BCCI) July 11, 2025
हेही वाचा : शुभमन गिल शेजारी सारा तेंडुलकर; सर जडेजाने घेतली ‘प्रिन्स’ची फिरकी, युवा कर्णधार लालेलाल; पहा Video
रूटला बुमराहने क्लीन बोल्ड केला, तर वोक्सला गोल्डन डकवर ध्रुव जुरेलकडे झेलबाद केले. ११० व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरचे स्टंप उडवून करून बुमराहने सामन्यातील आपले पाच बळींचा आकडा गाठला. बुमराहने पहिल्या डावात २७ षटकांत ७४ धावा देत ५ विकेट्स मिळवल्या.आणि भारताला इंग्लंडला ३८७ धावांवर गारद करण्यास मदत केली. बुमराहच्या नावावर ४७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १५ वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम जमा आहे. या १५ सामन्यांपैकी त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये चार, दक्षिण आफ्रिकेत तीन आणि भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये प्रत्येकी दोन बळी टिपले आहेत.