इंग्लंडविरुद्ध भारतीय टिम(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर खेळला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर संपला. जो रूटचे शतक आणि जिमी स्मिथ अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने धावा केल्या आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
इंग्लंडचा डाव
पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी इंग्लंड संघाने ४ विकेट गमावून २५१ धावा उभारल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, जो रूट (९९) आणि कर्णधार बेन स्टोक्स (३९) नाबाद होते. तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंग्लडकडून सलामीवीर जॅक क्रॉली आणि बेन डकेट मैदानात फलंदाजीस उतरले. इंग्लंडची सुरवात फारसी चांगली झाली नाही. ४४ धावांवर इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले. बेन डकेटच्या रूपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. त्याला २३ धावांवर नितेश कुमार रेड्डीने माघारी पाठवले. तर त्याच्या सहकारी सलामीवीर जॅक क्रॉलीला देखील नितेश कुमारने आपल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर १८ धावांवर बाद केले. पहिल्या दिवशी ऑली पोप ४४ धावा, जॅक क्रॉली १८, बेन डकेट १८ आणि हॅरी ब्रुक ११ धावा करून बाद झाले.
तिसऱ्या दिवशी जो रूटने बुमराहच्या पहिल्या चेंडुवर चौकार लगावून कसोटी कारकिर्दीतील ३७ वे शतक पूर्ण केले. तर कर्णधार बेन स्टोक्स आपल्या धावसंख्येत ५ धावांची भर टाकून ४४ धावांवर बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवाला. तर त्याच ओव्हरमध्ये बुमराहने जो रूटला माघारी पाठवले. जो रूट १०४ धावा करू शकला. त्यांनतर विकेटकिपर जेमी स्मिथ आणि कार्सने डाव सावरला. जेमी स्मिथ ५१ धावा करून बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने आपली शिकार बनवले. कार्स ५६ , ख्रिस वोक्स ०, जोफ्रा आर्चर ४ धावा काढून बाद झाले तर शोएब बशीर १ धावावर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या तर रेड्डी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ तर जाडेजाने १ विकेट घेतली.
हेही वाचा : IND vs ENG : जो रूट एक्सप्रेस सुसाट! लॉर्ड्सवर शतक ठोकताच रचला इतिहास; असे करणारा ठरला जगातील एकमेव फलंदाज..