शुभमन गिल, सारा तेंडुलकर आणि रवींद्र जाडेजा(फोटो-सोशल मीडिया)
Shubman Gill next door to Sara Tendulkar : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिल इंग्लंडमध्ये शानदार खेळ करत आहे. एकूण गिल नेतृत्वाखालील भारतीय संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगलं पुनरागमन करत इंग्लंडला ३३६ धावांनी पराभूत केले. गिलच्या बॅटसिने तो चर्चत असताना तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. शुभमन गिलसह संपूर्ण टीम इंडिया युवराज सिंगच्या एका कार्यक्रमाला हजर होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत तिथे पोहोचला होता. शुभमन आणि साराला एकाच कार्यक्रमात पाहून लोकांनी पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरु केली. इतकेच नाही तर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायला देखील सुरुवात केली आहे. आता सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रवींद्र जडेजा शुभमन गिलला चिडवत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : IND vs ENG : लॉर्ड्सवर इंग्लंड ३८७ धावांवर गारद; जो रूटचे शतक, तर बुमराहच्या ५ विकेट्स
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शुभमन गिल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा बसलेले दिसत आहेत. त्यानंतर टाळ्या वाजवायला सुरुवात होते आणि लक्ष अंजली तेंडुलकरवर जाते. त्यानंतर रवींद्र जडेजा शुभमनला चिडवताना दिसून येत आहे. सर जडेजा फक्त शुभमनलाच चिडवत नाही तर केएल राहुल देखील खूप हसताना दिसतो. तर ऋषभ पंतही हसत जडेजाच्या पाठीवर थाप मारत आहे.
Jaddu 🤣 pic.twitter.com/ua6fSI8bIA — Out Of Context Cricket (@GemsOfCricket) July 11, 2025
युवराज सिंगच्या एका कार्यक्रमातून गिल आणि सारा तेंडुलकरचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये शुभमन गिल प्रवेश करतो आणि सारा त्याच्याकडे पाहत असते. परंतु, कसोटी कर्णधार तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. गिल तसाच पुढे निघून जातो. तसेच एका व्हिडिओमध्ये सारा तेंडुलकर शुभमन गिलसह टीम इंडियाचा व्हिडिओ बनवताना दिसून आले आहेत. सोशल मीडियावर अशा चर्चा आहेत कि, दोघेही चांगले मित्र आहेत, जरी नवराष्ट्र याची पुष्टी करत नाही.
सध्या शुभमन गिलचे लक्ष लॉर्ड्स कसोटीवर आहे. तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया 2-1 ने पुढे जाण्याचे प्रयत्न करणारा आहे. भारताचा युवा कसोटी कर्णधार शुभमन गिल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. गिलने कर्णधार म्हणून पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनेक विक्रम मोडीत काढले आहे. त्याने लीड्स आणि एजबॅस्टन कसोटी सामन्यात दोन शतके आणि एक द्विशतक देखील लगावले आहे.