
IND vs ENG 5th Test: Joe Root sets another record in England! He is the first player in the world to achieve such a feat..
ओव्हल येथे खेळलला जाणारा पाचवा सामना हा जो रूटचा इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध २० वा कसोटीसामना आहे. या कसोटीदरम्यान त्याने इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध २००० धावा करण्याचा भीम पराक्रम देखील केला आहे. जो रूटला इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध २००० कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी ओव्हल कसोटीत २३ धावांची गरज होती. त्याने सिराजच्या चेंडूवर चौकार मारून ही कामगिरी करून दाखवली आहे.
जो रूटनंतर, ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने एका देशात भारताविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियामध्ये भारताविरुद्ध १५ कसोटी सामने खेळले आहे. यामध्ये त्याने १८९३ धावा केल्या आहेत. तर स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये १३ कसोटी सामन्यांमध्ये भारताविरुद्ध एकूण १३९६ धावा फटकावल्या आहेत. एकूण १५ फलंदाजांनी भारताविरुद्ध एकाच देशात १००० पेक्षा जास्त कसोटी धावा केल्या आहेत, परंतु इंग्लंडचे रूट आणि कुक हे एकमेव दोन क्रिकेटपटू आहेत ज्यांनी भारताविरुद्ध घरच्या मैदानावर (इंग्लंड) आणि परदेशात (भारतात) १००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत.
इंग्लंडमध्ये एखाद्या देशाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याबाबत बोललो तर रूटनंतर अॅलिस्टर कुकचे नाव घ्यावे लागते. त्याने १७ सामन्यांमध्ये ११९६ धावा केल्या आहेत. त्यानंतर ग्रॅहम गूचचा नंबर लागतो. ज्याने १० सामन्यांमध्ये ११३४ धावा काढल्या आहेत. याव्यतिरिक इंग्लंडच्या कोणताही फलंदाज इंग्लंडमधील संघाविरुद्ध १००० धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
हेही वाचा : फुटबॉलप्रेमींसाठी खुशखबर! फुटबॉलपटू मेस्सी गाजवणार वानखेडेचे मैदान; सचिन-विराटसोबत खेळणार क्रिकेट सामना
खेळाडू सामने धावा सरासरी सर्वोत्तम धावसंख्या