टीम इंडिया (फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. भारतचा पहिला डाव २२४ धावांवर आटोपला असून या कसोटीतील पहिल्या डावात हवी तशी फलंदाजी करता आली नाही. परंतु, एकूणच संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. या फलंदाजांच्या शानदार कामगिरीने भारतीय कसोटी संघाने एक मोठा कारनामा केला आहे. या मालिकेत भारताने आतापर्यंत ३४०० धावा करण्याची किमया केली आहे.
हेही वाचा : फुटबॉलप्रेमींसाठी खुशखबर! फुटबॉलपटू मेस्सी गाजवणार वानखेडेचे मैदान; सचिन-विराटसोबत खेळणार क्रिकेट सामना
ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाने २२४ धावा करून चालू मालिकेत भारताच्या एकूण धावा ३४१३ झाल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाकडून कसोटी मालिकेत ३४०० पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. भारतीय संघाने पहिल्यांदाच हा पराक्रम करून दाखवला आहे. यासह, भारतीय संघ ऑस्ट्रेलियासह एलिट यादीमध्ये समाविष्ट झाला आहे.
यापूर्वी, कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा भारताचा विक्रम हा ३२७० धावा होता. जो भारताने सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली १९७८-७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सहा कसोटी सामन्यांच्या मालिके दरम्यान केला होता. सुनील गावस्कर यांनी या मालिकेत ७३२ धावा कुठल्या होत्या. यावेळी, कर्णधारपद सांभाळणाऱ्या शुभमन गिलने आपल्या बॅटने धमाकेदार कामगिरी करत आतापर्यंत ७४३ धावा फटकावल्या आहेत. जे गावस्कर यांच्या विक्रमापेक्षा जास्त आहेत.
यापूर्वी कसोटी इतिहासात, फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांनाच एका मालिकेत ३४०० पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सहा वेळा हा पराक्रम करून दाखवला आहे. तर इंग्लंड संघाने चार वेळा ३४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : स्टार श्रेयस अय्यर आशिया कपसाठी संघात परतणार? २० महिन्यांनंतर गाजवणार मैदान..
भारताचा कर्णधार शुबमन गिल हा अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पंजाबच्या या २५ वर्षीय फलंदाजाने नऊ डावांमध्ये चार शतकांसह एकूण ७४३ धावा फटकावल्या आहेत. त्याच्यानंतर केएल राहुलचा क्रमांक येतो. राहुलनेआतापर्यंत एकूण धावसंख्येत ५२५ धावा काढल्या आहेत. तर ऋषभ पंतने चार सामन्यांच्या सात डावांमध्ये ४७९ धावांसह तिसऱ्या स्थानाव रविराजमान आहे.